मुंबई, 15 मे : मुंबईत राहणाऱ्या 23 वर्षांची कॅप्टन आरोही पंडितने अटलांटिक महासागर पार करणाऱी जगातील पहिली महिला ठरली आहे. या कामगिरीसह तिने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आरोहीने एका लहान विमानातून 3 हजार किलोमीटर अंतर पार करत इकालुइट विमानतळावर पोहोचली. दरम्यान ती ग्रीनलँडसह दोन ठिकाणी थांबली होती.
एक वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या जागतिक विमान प्रवासाच्या योजनेचा हा एक भाग आहे. एसेसे या सामाजिक संस्थेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे की, या प्रवासादरम्यान आरोहीने विश्वविक्रम केला आहे. ती भारतात परत येईपर्यंत आणखी काही विक्रम नावावर करेल.
आरोही एलएसए परवानाधारक असून तीने भारतातून विमानोड्डाण केले होते. ती पंजाब, राजस्थान, गुजरातच्या वरून पाकिस्तानात पोहोचली होती. यावेळी 1947 नंतर एलएसए विमान उतरवणारी ती पहिली शेजारी देशातील नागरिक ठरली होती. कॅनडातही तिने विमान उतरवले होते.
आपल्या प्रवासाबद्दल आरोहीने सांगितले की, मला खूप अभिमान वाटत असून आनंद झाला आहे. आपल्या देशासाठी काही करताना जगातील पहिली महिला ठरल्याचा अभिमान आहे. अटलांटिक महासागर पार करण्याचा अनुभव जबरदस्त होता. तिथं फक्त मी, लहान विमान आणि आकाश आणि खाली निळाशार समुद्र होता.
VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!