अल रेयान, कतार: कतारमध्ये सध्या फिफा वर्ल्ड कपच्या साखळी सामन्यांना चांगलाच रंग चढलाय. काल क्रोएशिया आणि कॅनडामधल्या सामन्यात तर पहिल्या काही मिनिटातच फुटबॉल चाहत्यांना थरार अनुभवायला मिळाला. या मॅचमध्ये कॅनडाच्या अल्फान्सो डेव्हिसनं यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमधला आतापर्यंतच्या सर्वात वेगवान गोलची नोंद केली. सामना सुरु होण्याच्या 68व्या सेकंदाला डेव्हिसनं बॉल गोलजाळ्यात धाडला आणि विक्रमी गोलची नोंद केली.
कोण आहे अल्फोन्सो डेव्हिड?
कॅनडाकडून खेळणारा 22 वर्षांचा अल्फोन्सो डेव्हिड हा क्लब फुटबॉलमध्ये बायर्न म्युनिचचा स्टार प्लेयर आहे. याच युरोपियन क्लबचे सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये तब्बल 17 खेळाडू खेळत आहेत. डेव्हिसनं बायर्न म्युनिचकडूनही 5 गोल केले आहेत. कॅनडाची टीम यंदा 36 वर्षांनी फिफा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली होती. पण क्रोएशियाविरुद्धच्या पराभवानंतर साखळी फेरीतच कॅनडाचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
- ⚡
Watch @AlphonsoDavies script history by scoring 's first-ever #FIFAWorldCup goal ⚽#Qatar2022 #CROCAN #WorldsGreatestShow #FIFAWConJioCinema #FIFAWConSports18 pic.twitter.com/lx4RhalAeC — JioCinema (@JioCinema) November 27, 2022
हेही वाचा - Vijay Hajare Trophy: जिंकलंस भावा! वर्ल्ड रेकॉर्ड करुनही ऋतुराजनं 'या' खेळाडूशी शेअर केला सामनावीर पुरस्कार
क्रोएशिया 4-1 ने विजयी
कॅनडानं दुसऱ्याच मिनिटाला केलेला गोल हा त्यांचा या सामन्यातला एकमेव गोल ठरला. पण त्यानंतर मात्र क्रोएशियानं कॅनडाला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. क्रोएशियानं कॅनडाच्या गोलपोस्टमध्ये 4 गोल डागले. कॅनडाच्या पहिल्या गोलनंतर ल्युका मॉड्रिचच्या या टीमनं दमदार कमबॅक केलं. क्रोएशियाकडून क्रॅमारिचनं 2 तर लिवेजा आणि मेजरनं प्रत्येकी एक गोल केला. क्रोएशियाचा यंदाच्या वर्ल्ड कपमधला हा पहिलाच विजय ठरला. याआधी मोरोक्कोविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. ग्रुप F मध्ये असलेली क्रोएशिया सध्या 4 पॉईंट्ससह अव्वल स्थानावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup, Sports