कॅमेऱ्यामागे माझे बाबा आहेत, क्रिकेटच्या मैदानातला चिमुकलीचा VIDEO VIRAL

कॅमेऱ्यामागे माझे बाबा आहेत, क्रिकेटच्या मैदानातला चिमुकलीचा VIDEO VIRAL

क्रिकेटचा सामना बघायला आलेल्या मुलीकडे कॅमेरामन बापाने कॅमेरा वळवला आणि त्यानंतर lतिने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर सध्या क्रिकेट स्टेडियममधील कॅमेरामनची आणि त्याच्या मुलीची चर्चा होत आहे. टी20 मुंबई लीग सुरू असून त्यात वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामन्याचे चित्रिकरण करणाऱ्या एका कॅमेरामनचे कुटुंबीय सामना पाहण्यासाठी आलं होतं. त्यावेळी कॅमेरामनने षटक संपताच त्याच्या कुटुंबियांकडे कॅमेरा फिरवला.

मुलीने जेव्हा स्क्रिनवर स्वत:ला पाहिलं तेव्हा ती आनंदाने किंचाळली. वडिलांकडे पाहून ती हात हालवत होती. त्यावेळी दुसऱ्या कॅमेरामनने त्या चिमुकलीच्या वडिलांकडे आपला कॅमेरा वळवला. तेव्हा त्यांनीही मुलीकडे पाहून हाताने इशारा केला.

कॅमेरामनच्या मुलीने हातात एक पोस्टर घेतलं होतं. त्यात लिहिलं होतं की, माझे वडिल कॅमेऱ्यामागे आहेत. त्यावेळी मुलीच्या चेहऱ्यावरचे भाव अनेकांना आवडले. टी20 मुंबईने हा व्हिडिओ 24 डिसेंबरला शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

एका युजरने म्हटलं की, मुलगी आणि वडिलांमधील प्रेम किती सुंदर असतं ते हा व्हिडिओ पाहून कळतं. दुसऱ्या एका ने म्हटलं की, आतापर्यंत मुलीचे आणि वडिलांचे अनेक व्हिडिओ पाहिले पण या व्हिडिओनं मन जिंकलं. मुलीची रिअॅक्शन खूपच सुंदर होती.

ऋषभ पंत, सरफराज आणि झिव्हाचे मजेशीर प्रसंग, हे मजेशीर VIDEO पाहून पुन्हा हसाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Dec 29, 2019 02:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading