Home /News /sport /

कोच होताच राहुल द्रविडला मोठा धक्का, मिळणार नाही आवडती टीम!

कोच होताच राहुल द्रविडला मोठा धक्का, मिळणार नाही आवडती टीम!

राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य कोच (Team India Head Coach) म्हणून नियुक्ती झाली आहे. यानंतर आता द्रविडला लवकरच त्याचे नवे सहकारी मिळणार आहेत. बॅटिंग कोच म्हणून विक्रम राठोड (Vikram Rathore), बॉलिंग कोच म्हणून पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांची नियुक्ती होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर : राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य कोच (Team India Head Coach) म्हणून नियुक्ती झाली आहे. यानंतर आता द्रविडला लवकरच त्याचे नवे सहकारी मिळणार आहेत. बॅटिंग कोच म्हणून विक्रम राठोड (Vikram Rathore), बॉलिंग कोच म्हणून पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) यांची नियुक्ती होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पारस म्हांब्रे सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमी (एनसीए) मध्ये बॉलिंग कोच आहे. याशिवाय राहुल द्रविडने फिल्डिंग कोच म्हणून अभय शर्मा (Abhay Sharma) यांचं नाव सुचवलं आहे, पण क्रिकेट सल्लागार समिती अभय शर्मा यांचं नाव रद्द करू शकते. फिल्डिंग कोचच्या शर्यतीत टी दिलीप (T Dilip) अभय शर्मा यांच्या पुढे गेले आहेत. नवीन कोचिंग टीम 17 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंड सीरिजपासून जबाबदारी स्वीकारणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार 'अभय बराच काळ राहुल द्रविडसोबत आहे, त्यामुळे प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो, पण काम पुढे चालू ठेवण्यासाठी अभयने एनसीएमध्ये राहावं, असं क्रिकेट सल्लागार समितीला वाटत आहे. राहुलने अभयचं नाव सुचवलं, पण दोघंही या पदासाठी लायक आहेत. टी दिलीप श्रीलंका दौऱ्यावर फिल्डिंग कोच म्हणून गेले होते. तसंच त्यांनी टीमसोबत आधीही काम केलं आहे. अभयला युवा खेळाडूंबाबत माहिती आहे,' असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. भारताचा माजी विकेट कीपर अजय रात्रानेही फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला होता. रात्रा भारताकडून 6 टेस्ट आणि 12 वनडे खेळला, याशिवाय त्याला 99 प्रथम श्रेणी मॅचचा अनुभवही आहे. तो सध्या आसाम क्रिकेट टीमचा मुख्य कोच आहे. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबतही काम केलं आहे. अजय रात्रा भारतीय महिला टीमसोबतही होता, तसंच त्याने एनसीएमध्येही काम केलं. फिल्डिंग कोचच्या रेसमध्ये रात्रा टी दिलीप आणि अभय शर्मा यांच्या मागे पडला. विक्रम राठोड कायम सध्याच्या टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड हे या पदावर कायम राहू शकतात. राठोड यांनी या पदासाठी पुन्हा अर्ज केला होता. मुख्य कोच रवी शास्त्री, बॉलिंग कोच भरत अरूण आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर यांनी पुन्हा अर्ज केला नाही. राठोड भारतासाठी 6 टेस्ट आणि 7 वनडे खेळले, यात त्यांनी 131 आणि 193 रन केले. राठोड यांनी 146 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 11,473 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rahul dravid, Team india

    पुढील बातम्या