BWF World Championship : Happy Birthday अम्मा! सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट

एका आईला आपल्या मुलीकडून मिळालेलं हे सर्वोत्तम गिफ्ट असेल.

News18 Lokmat | Updated On: Aug 25, 2019 07:26 PM IST

BWF World Championship : Happy Birthday अम्मा! सिंधूनं आईला दिले ‘सुवर्ण’ गिफ्ट

बासेल, 25 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं आपल्या आईच्या वाढदिवसादिवशी दिला सुवर्ण गिफ्ट दिले आहे. रविवारी झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत महिला सिंगल अंतिम सामन्यात जपानच्या नोहामी ओकुहाराला पराभूत करत इतिहास रचला. सिंधूनं 21-7, 21-7 अशा सरळ दोन सेटमध्ये ओकुहाराचा पराभव केला. या विजयानंतर सिंधूनं, “आज आईचा वाढदिवस असल्यामुळं हे सुवर्ण पदक मी दिला समर्पित करते”, असे सांगितले.

दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 37 मिनिटे सुरु असलेल्या या सामन्यात सिंधून सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. या सामन्यात सिंधूनं पहिल्या मिनिटांपासून ओकुहारावर आघाडी घेतली. 2017मध्ये ओकुहाराकडून सिंधूला पराभवाचा फटका बसला होता. याचा बदला घेत सिंधूनं सुवर्ण पदक जिंकले. सामना जिंकल्यानंतर सिंधूनं आईचा वाढदिवस असल्याचे सांगितले. त्यानंतर दर्शकांनी सिंधूच्या आईचा हॅपी बर्थ डे म्हणत शुभेच्छा दिल्या.

माझ्या विजय देशासाठी महत्त्वाचा

सामन्यानंतर सिंधूनं, “हा विजय माझ्यासाठी खुप महत्त्वाचा होता. माझ्या देशासाठीही हा विजय तेवढाच महत्त्वाचा होता. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे”, असे मत व्यक्त करताना सिंधू भावूक झाली. या पूर्ण स्पर्धेत सिंधूला दर्शकांनी समर्थन दिले. त्यामुळं सिधूनं दर्शकांचेही आभार मानलेय तसेच, कोच गोपिचंद आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले.

‘घेतला 2017चा बदला’

Loading...

2017मध्ये झालेल्या विश्व चॅम्पियन स्पर्धेत नाओमी ओकुहारानं सिंधूला हरवले होते. या दोघांमध्ये आतापर्यंत 15 सामने झाले आहे. त्यातील 8 सामन्यात सिंधूनं विजय मिळवला आहे. 2017मध्ये सिंधू आणि ओकुहारा यांच्यात तब्बल 110 मिनीटे सामना चालला होता. वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या इतिहासतला हा सर्वात मोठा अंतिम सामना होता. यात 73 शॉट्सची रॅली झाली होती.

वाचा-भारतीयांसाठी ‘गोल्डन’ संडे! वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास

‘आम्ही सुवर्ण पदकाची वाट पाहत होतो’

सिंधूच्या विजयानंतर हैदराबादमध्ये असलेल्या तिच्या घरत्यांनी आनंद साजरा केला. सिंधू सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे. यावर सिंधूची आई पी. विजया हिनं, “आम्हाला खुप आनंद झाला आहे. आम्ही कधीपासून या सुवर्ण पदकाची वाट पाहत होता. सिंधूनं खुप मेहनत घेतली होती”, असे मत व्यक्त केले.

सरळ सेटमध्ये केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात चीनच्या चेन यू फेई (Chen yu Fei)चा सलग सेटमध्ये पराभव करत फायनलमध्ये दणक्यात एण्ट्री घेतली. सिंधूनं 40 मिनिटे चाललेल्या खेळात फेईचा 21-7,21-14नं पराभव केला. पहिल्या गेमपासूनच सिंधूनं आघाडी मिळवली होती. त्यामुळं चेन प्रचंड दबावात खेळत होती. चेनचा या एका गोष्टीचा फायदा सिंधूनं घेतला आणि ब्रेक पर्यंत 11-3ची आघाडी मिळवली. ब्रेकनंतर चेन क्रोस कोर्ट खेळत गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचे प्रयत्न सिंधूच्या खेळीसमोर फोल ठरले. सिंधूनं दमदार स्मॅश आणि कोर्ट कव्हरेजच्या जोरावर 15 मिनिटांचा पहिला गेम 21-7नं आपल्या नावावर केला.

वाचा-सिंधूची ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

दोन वर्षांपासून हुकले होते सिंधूचे सुवर्ण

सिंधूनं सलग तिसऱ्यांदा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आतापर्यंत एकदाही सिंधूला विजय मिळवता आलेला नाही. या विजयासह यिंग विरोधात सिंधूचा रेकॉर्ड आता 5-10 झाला आहे.

VIDEO: मुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...