BWF World Championships 2019, Final, PV Sindhu vs Nozomi Okuhara : सिंधूला बदला घेण्याची सुवर्णसंधी, इथं पाहू शकता लाइव्ह मॅच

BWF World Championships 2019, Final, PV Sindhu vs Nozomi Okuhara : सिंधूला बदला घेण्याची सुवर्णसंधी, इथं पाहू शकता लाइव्ह मॅच

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली आहे.

  • Share this:

बासेल, 25 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूनं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिचा सामना जपानच्या नाओमी ओकुहाराशी होणार आहे. सिंधुने सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. सिंधुला 2017 मध्ये ओकुहारानं आणि 2018 मध्ये स्पेनच्या कॅरोलिना मारिननं पराभूत केलं होतं. सिंधुला 2017 च्या पराभवाची परतफेड करण्याची आणि सुवर्ण पदक जिंकण्याची संधी आहे.

यंदा सेमीफायनलमध्ये सिंधुनं चीनच्या चेन यू फेईला 40 मिनिटात 21-7, 21-14 अशा फरकाने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. गेल्यावेळी सिंधुलाचा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ओकुहाराशी सामना झाला होता. त्यात ओकुहारानं बाजी मारली होती.

2019 च्या चॅम्पियनशिपचा अंतिम सामना स्वित्झर्लंडमध्ये होणार असून रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेचार वाजता सुरू होईल.

पीव्ही सिंधू आणि नाओमी ओकुहारा यांच्यातील लढत स्टार स्पोर्ट्स 1, स्‍टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 एचडी या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. याशिवाय हॉटस्टारवर ऑनलाइन स्ट्रीमिंगवर पाहता येईल.

सायना नेहवाल स्पर्धेबाहेर

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकणारी सायना नेहवाल विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेबाहेर गेली आहे. पूर्व उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टनं सायनाचा पराभव केला. एक तास 12 मिनिटे चालल्या या सामन्यात 15 -21, 27-25, 21-12 अशा तीन सेटमध्ये सायनाला पराभव स्विकारावा लागला.

साई प्रणितनं मिळवले सेमीफायनलमध्ये स्थान

भारतीय पुरुष संघाचा बॅडमिंटनपटू साई प्रणितनं वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यानं इंडोनेशियाच्या जॉनाटन क्रिस्टीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. प्रणितनं क्रिस्टीला 24-22, 21-14नं मात दिली. हा सामना तब्बल 51 मिनिटांचा होता. यामुळं भारताचा 36 वर्षांचा दुष्काळ संपला आहे.

नाशिक-पुणे मार्गावर 3 वाहनांची एकमेकांना धडक, अपघाताचा थरारक VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 25, 2019, 12:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading