• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • टीम इंडियाच्या Merchandise घर बसल्या मिळणार! खेळाडूंच्या जर्सीपासून सगळं एवढ्या रुपयांना

टीम इंडियाच्या Merchandise घर बसल्या मिळणार! खेळाडूंच्या जर्सीपासून सगळं एवढ्या रुपयांना

आपल्या देशात क्रिकेट (Cricket) हा प्रमुख लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, त्यामुळे देशभरात क्रिकेट आणि क्रिकेटर्सचा चाहता वर्ग मोठा आहे. आपला आवडता क्रिकेटर कोणत्या वस्तू किंवा साहित्य (Team India Merchandise) वापरतो, याचं बारीक निरीक्षण त्यांचा चाहता वर्ग करत असतो.

  • Share this:
मुंबई, 22 सप्टेंबर : आपल्या देशात क्रिकेट (Cricket) हा प्रमुख लोकप्रिय खेळांपैकी एक आहे, त्यामुळे देशभरात क्रिकेट आणि क्रिकेटर्सचा चाहता वर्ग मोठा आहे. आपला आवडता क्रिकेटर कोणत्या वस्तू किंवा साहित्य वापरतो, याचं बारीक निरीक्षण त्यांचा चाहता वर्ग करत असतो. आयपीएल (IPL) किंवा वर्ल्ड कपसारख्या (World Cup) मोठ्या स्पर्धांदरम्यान क्रिकेटर्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी अनेक चाहते क्रिकेटर्स वापरत असलेल्या बॅट्स, जर्सी आदी साहित्य आवर्जून खरेदी करतात. अनेकदा चाहते या साहित्यासह स्टेडिअमवर उपस्थित असतात. केवळ आयपीएल किंवा वर्ल्डकप या वेळीच नाही, तर इतर वेळीही या साहित्याला, वस्तूंना मोठी मागणी असते. क्रिकेटर्स वापरत असलेल्या विविध वस्तू सर्वसामान्यपणे काही विशिष्ट दुकानांमध्येच उपलब्ध होत असत; मात्र आता या वस्तू ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. यासाठी एमपीएल स्पोर्ट्स (MPL Sports) या भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत किट प्रायोजक कंपनीनं पुढाकार घेतला आहे. ज्या शहरात ई-कॉमर्स (E-Commerce) सेवा उपलब्ध आहेत, तिथले क्रिकेटचे चाहते क्रिकेटशी संबंधित विविध वस्तू अगदी घरबसल्या खरेदी करू शकणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना (Fans) या सर्व वस्तू अगदी सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमपीएल प्रयत्नशील असून, या वस्तूंची ऑनलाइन विक्री हे त्याकरिता उचलेलं महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल. क्रिकेटशी संबंधित आणि क्रिकेटर्स वापरत असलेली प्रत्येक वस्तू (Merchandise Salmon) आता अगदी सहज उपलब्ध होणार आहे. भारतीय पुरुष, महिला टीम आणि 19 वर्षांखालच्या क्रिकेट संघाचे अधिकृत किट प्रायोजक असलेल्या एमपीएल स्पोर्टसनं मंगळवारी अॅमेझॉन (Amazon), मिंत्रा (Myntra) आणि फ्लिपकार्ट या शॉपिंग प्लॅटफॉर्मशी (Flipcart) भारतात भागीदारी करत असल्याची घोषणा केली. ``भारतीय क्रिकेट टीम वापरत असलेल्या विविध वस्तू देशभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी सहजपणे उपलब्ध करून देण्याचा आमचा हेतू आहे,` असं या खास ब्रॅंडनं म्हटलं आहे. अशी असेल किंमत टीमची आधिकृत जर्सी (Jersey), ट्रेनिंग गियर आणि लाइफस्टाइल वेअरचं (Lifestyle wear) संपूर्ण कलेक्शन या शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल. या विविध वस्तूंचे दर 999 रुपयांपासून सुरू होतील. देशातल्या ज्या शहरांमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांची सेवा उपलब्ध आहे, तेथे ही सेवा उपलब्ध होणार असल्याचं बेंगळुरूस्थित एमपीएल स्पोर्ट्स या कंपनीने सांगितलं. `वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात हेच उद्दिष्ट` टीम इंडिया वापरत असलेल्या विविध वस्तू भारतातल्या अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अधिकृतपणे उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ आहे. खेळाडूंच्या देशभरातल्या चाहत्यांना या वस्तू सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, हाच यामागचा प्रमुख उद्देश असल्याचं एमपीएल स्पोर्ट्सचे प्रमुख शोभित गुप्ता यांनी सांगितलं.
First published: