धक्कादायक! सामन्यावेळीच खेळाडूचा मृत्यू, भावाच्या नावावर उतरला होता मैदानात; पाहा VIDEO

धक्कादायक! सामन्यावेळीच खेळाडूचा मृत्यू, भावाच्या नावावर उतरला होता मैदानात; पाहा VIDEO

गेल्या वर्षभरापासून तो भावाच्या नावावर खेळत होता. या प्रकारामुळे आता आयोजकांवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • Share this:

सोफिया, 25 सप्टेंबर : क्रीडा जगतात अनेक दुर्घटना घडत असतात. मैदानावर खेळत असतानाच खेळाडूंना प्राण गमावावा लागल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावर चेंडू लागून तर बॉक्सरला जोरात मार लागल्यानं मृत्यू होतो. नुकताच बॉक्सिंगमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर व्यवस्थापनावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्यावसायिक लढतीत दुखापत झाल्यानंतर एका बॉक्सरला प्राण गमावावे लागले. मात्र, त्याच्या मृत्यूनंतर झालेला खुलासा धक्कादायक होता. ज्या नावाच्या बॉक्सरचा मृत्यू झाला तो जिवंत आहे. तर ज्याचा प्रत्यक्ष मृत्यू झाला तो बॉक्सर भावाच्या नावावर रिंगमध्ये उतरला होता.

बल्गेरियात एका लढतीत दुखापत झाल्यानंतर बोरिसचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर चुलत भाऊ इस्सने खुलासा केला की बोरिस वर्षभर त्याच्या लायसनवर खेळत होता. दरम्यान, इस्सच्या नावानं खेळत असलेल्या बोरिसच्या मृत्यूनंतर वर्ल्ड बॉक्सिंग काउन्सिलने 21 वर्षीय इस्सला श्रद्धांजली वाहिली होती. इस्सने फेसबुकवरून सत्य सांगितलं.

बीटीव्हीशी बोलताना इस्सने स्पष्ट केलं की, बोरिस वर्षभर त्याच्या लायसनचा वापर करत होता. आपलं नाव सार्वजनिक करण्याआधी अनुभव घेण्यासाठी त्यानं असं केल्याचं इस्सने म्हटलं.

बोरिस फेदरवेटमध्ये आर्दिट मुर्जाविरुद्ध रिंगमध्ये उतरला होता. यावेळी मुर्जाचा पंच इतका जबरदस्त लागला की कॉर्नरवर येता येता तो अडखळला आणि पडला. त्यानंतर वैद्यकीय पथकानं तो शुद्धीवर येण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याचा मृत्यू झाला.

VIDEO : माझे पैसे द्या, भाजी विकणाऱ्या महिलाचा पीएमसी बँकेत आक्रोश

Published by: Suraj Yadav
First published: September 25, 2019, 8:21 AM IST
Tags: Boxer

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading