मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /भारताला रेड लिस्टमध्ये टाकल्यामुळे कसं होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं आयोजन? ICC म्हणते...

भारताला रेड लिस्टमध्ये टाकल्यामुळे कसं होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं आयोजन? ICC म्हणते...

भारतातल्या वाढत्या कोरोनाग्रस्तांची (Corona Virus in India) संख्या बघता ब्रिटनने (Britain) भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. ब्रिटन सरकारच्या या निर्णयामुळे जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलबाबत (ICC World Test Championship Final) प्रश्न उपस्थित झाले होते.

पुढे वाचा ...

दुबई, 20 एप्रिल : भारतातल्या वाढत्या कोरोनाग्रस्तांची (Corona Virus in India) संख्या बघता ब्रिटनने (Britain) भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. ब्रिटन सरकारच्या या निर्णयामुळे जून महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलबाबत (ICC World Test Championship Final) प्रश्न उपस्थित झाले होते, पण आयसीसीने ठरलेल्या वेळेनुसार 18 जूनला भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनला हा सामना खेळवला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ब्रिटन सरकारने भारताला रेड लिस्टमध्ये टाकल्यामुळे दोन्ही देशांमधल्या प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. तसंच त्यांच्या नागरिकांना मायदेशात परतल्यानंतर 10 दिवस हॉटेलमध्येच क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

ब्रिटन सरकारने एवढे कडक नियम बनवले असले, तरी आयसीसीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल यशस्वीरित्या आयोजित केली जाईल, असा विश्वास आहे.

आयसीसीने सोमवारी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपण महामारीतही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कसं आयोजन करू शकतो हे दाखवून दिलं. भविष्यातही आम्ही अशाप्रकारचं आयोजन करू शकतो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 जूनपासून ब्रिटनमध्ये होईल. आम्ही याबाबत ब्रिटीश सरकारशी चर्चा करू, असं आयसीसीने सांगितलं आहे.

दुसरीकडे बीसीसीआयने (BCCI) पीटीआय भाषाशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. जेव्हा भारत फायनल खेळण्यासाठी जाईल, तेव्हा भारत रेड लिस्टमध्ये नसेल, अशी अपेक्षा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

कोरोनाच्या संकटामुळे लॉर्ड्सवर होणारी फायनल साऊथम्पटनमध्ये खेळवली जाणार आहे. साउथम्पटनच्या रोज बाऊल स्टेडियममध्येच हॉटेल आहे. फायनलसाठी खेळाडू तिकडेच राहणार आहेत. रेड लिस्टमधल्या देशातल्यांना परवानगी मिळाली, तर टीम तिकडेच क्वारंटाईन होऊ शकते, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

भारताला रेड लिस्टमध्ये टाकल्यामुळे आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंसमोरही अडचणी येऊ शकतात. 2 जूनपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. 30 मेरोजी आयपीएलची फायनल खेळवली जाणार आहे.

First published:
top videos

    Tags: Britain, Corona, Cricket, Team india