क्रिकेटच्या मैदानातून ब्रायन लारा पोहचला थेट ताडोबाच्या जंगलात, फोटो व्हायरल

क्रिकेटच्या मैदानातून ब्रायन लारा पोहचला थेट ताडोबाच्या जंगलात, फोटो व्हायरल

भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या सांगण्यावरुन लारा थेट पोहचला ताडोबाच्या जंगलात.

  • Share this:

चंद्रपुर, 12 जून : क्रिकेटच्या इतिहासात आपल्या विक्रमांनी भल्याभल्या गोलंदाजांची झोप उडवणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज म्हणजे ब्रायन लारा. क्रिकेट आणि विक्रम यांना कोणता दुसरा समानार्थी शब्द असेल तर, तो म्हणजे लारा आहे. निवृत्तीनंतरही लारानं क्रिकेटचे मैदान सोडले नाही, समालोचक म्हणून तो चाहत्यांना क्रिकेटच्या मैदानावर दिसत असतो. मात्र सध्या तो सोशल मीडियावर एका वेगळ्यात कारणानं चर्चेत आला आहे.

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये लारा समोलोचक म्हणून मैदानावर दिसत असतो. मात्र काही कामानिमित्त लारा मुंबईत आला होता. यावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याच्या सांगण्यावरुन लारा मुंबईतून थेट पोहचला ताडोबाच्या जंगलात. लाराला अनेक दिवसांपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची भुरळ लागली आहे. त्यामुळं येथील वाघाचे दर्शन करण्यासाठी येथे आला होता. मंगळवारी ताडोबाच्या जंगलात त्याचे आगमन झाले असून एका खासगी रिसॉर्ट मध्ये त्याचा मुक्काम आहे. यावेळी लाराबरोबर सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. गुरुवारी मोहूर्ली येथून सकाळी तो जंगल सफारीचा आनंद लुटणार आहे. ताडोबा हे जागतिक किर्तीचे पर्यटनस्थळ मानले जाते, त्यामुळं येथील वाघांना बघण्यासाठी दरवर्षी सुमारे दोन लाखांवर पर्यटक भेट देतात. यात आता प्रसिध्द व्यक्तींसह सिनेकलावंत, क्रिकेटपटू व अन्य क्षेत्रातील नामांकित मान्यवरांचाही समावेश होत असल्यानं ताडोबाचे पर्यटन आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वाचा- ठरलं! ‘हा’ खेळाडू घेणार शिखर धवनची जागा, विराटला मोठा दिलासा

वाचा- World Cup : सलामीला केएल राहुल तर धवनच्या जागी 'हा' खेळाडू मिळवून देणार विजय?

वाचा- वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु होण्याआधी चाहत्यांना मोठा धक्का

SPECIAL REPORT : कोण भरून काढणार शिखरची 'गब्बर' जागा?

First published: June 12, 2019, 7:54 PM IST
Tags: brian lara

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading