मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रायन लाराचा मोठा निर्णय, तुम्ही देखील कराल कौतुक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रायन लाराचा मोठा निर्णय, तुम्ही देखील कराल कौतुक

भारतामधील  गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा  (Brian Lara) यानं त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतामधील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा (Brian Lara) यानं त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतामधील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा (Brian Lara) यानं त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 मे : देशात कोरना रुग्णांची (Covid 19) संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास प्रत्येक राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. देशातील हॉस्पिटल्समध्ये देखील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. अनेक ठिकाणी रुग्णांचा ऑक्जिन  अभावी मृत्यू होत आहे. भारतामधील  गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा (Brian Lara) यानं त्याचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. लारा सध्या आयपीएल स्पर्धेची कॉमेंट्री करण्यासाठी भारतामध्ये आहे. भारतामधील परिस्थिती पाहून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय लारानं घेतला आहे. वेस्ट इंडिजचा महान बॅट्समन ब्रायन लारा याचा आज 52 वा वाढदिवस आहे. टेस्ट क्रिकेटमधील वैयक्तिक सर्वोच्च स्कोअर देखील लाराच्या नावावर आहे.  त्याच्यातील गुणवत्तेमुळे लाराची तुलना नेहमीच सचिन तेंडुलकरशी (Sachin Tendulkar) करण्यात आली. आजही तो क्रिकेट फॅन्समध्ये लोकप्रिय आहे. लाराचा वाढदिवस हा क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाचा दिवस असतो. पण सध्याच्या कठीण परिस्थितीमध्ये वाढदिवस साजरा न करण्याचा संवेदनशील निर्णय लारानं घेतला आहे. क्रिकेटपटू उतरले मैदानात संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढाई लढत असताना आता क्रिकेटपटूही पुढे आले आहेत. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने भारताच्या ग्रामीण भागात 200 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर दान करण्याचा निर्णय घेतला आहे. शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) यांनीही त्यांच्या आयपीएल मानधनातली काही रक्कम कोरोनाविरोधातल्या लढाईसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ऑक्सिजन कॉनसनट्रेटरसाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) मिशन वायूसाठी 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर दिले आहेत. एमसीसीआयए म्हणजेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रिकल्चरच्या मिशन वायू मोहिमेला पाठिंबा म्हणून रहाणेने ही मदत केली आहे. अजिंक्यने दिलेले हे 30 ऑक्सिजन कॉनसनट्रेटर महाराष्ट्रात जिकडे कोरोनाचा कहर जास्त आहे, अशा जिल्ह्यांमध्ये पाठवले जाणार आहेत. महाराष्ट्र दिन आणि कोरोना संकट, मुंबई इंडियन्सचा चाहत्यांसाठी मराठमोळा मेसेज! भारतीय खेळाडूंप्रमाणेच परदेशी क्रिकेटपटूंनीही मदतीचा हात पुढे केला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सने (Pat Cummins) पीएम केयर फंडमध्ये 37 लाख रुपयांची तर ब्रेट लीने (Brett Lee) एक बिटकॉईन म्हणजेच जवळपास 42 लाख रुपये दिले.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Cricket, IPL 2021

पुढील बातम्या