IPL 2020 : IPLचा चॅम्पियन खेळाडू आता होणार शाहरूखच्या संघाचा नवा कोच!

IPL 2020 : IPLचा चॅम्पियन खेळाडू आता होणार शाहरूखच्या संघाचा नवा कोच!

जॅक कॅलिस यानं केकेआरच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या कोचसाठी शोध सुरु होता.

  • Share this:

कोलकाता, 15 ऑगस्ट : दोननेळा आयपीएलचा किताब मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघानं आयपीएल 2020साठी आपल्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिस यानं केकेआरच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या कोचसाठी शोध सुरु होता. आता न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि केकेआरचा सलामीचा फलंदाज ब्रॅंडम मॅक्युलम याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

ब्रॅंडम मॅक्युलमने आयपीएलमध्ये कोलकाता संघाकडूनच पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी करत मॅक्युलमनं नाबाद 158 धावा केल्या होत्या. मॅक्युलमनं केकेआरकडून 2008 ते 2010 पर्यंत खेळला. त्यानंतर पुन्हा 2012-2013मध्ये कोलकाताकडून खेळण्यास सुरुवात कोली. दरम्यान मॅक्युलमनं कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये नाईट रायडर्सची टीम ट्रिनबैगो यांना दोन वेळा चॅम्पियन केले आहे.

कोच म्हणून खुप खुश आहे मॅक्युलम

ब्रॅंडम मॅक्युलमनं केकेआर संघाचा कोच झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. तसेच, “हा माझ्यासाठी सन्मान आहे. नाईट रायडर्स हा आयपीएल आणि सीपीएलमध्ये चांगला संघ आहे. या संघाकडे खुप चांगले खेळाडू आहेत. त्यामुळं मी संघाला आयपीएल जिंकवून देण्याता प्रयत्न करेन.

वाचा-द्रविडच्या भरवशातला 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा बॅटिंग कोच!

का बनवले मॅक्युलमला कोच

ब्रॅंडम मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडच्या संघानं चांगली कामगिरी केली. ब्रॅंडम मॅक्युलम आपल्या आक्रमक फलंदाजीमुळं ओळखला जातो. याबरोबरच आयपीएलमध्ये त्यानं 109 सामन्यात 27.69च्या सरासरीनं 2880 धावा केल्या आहेत. त्यामुळं त्याची आक्रमक खेळी केकेआरसाठी फायद्याची ठरू शकते.

वाचा-‘पंत तू तर वन डे क्रिकेट खेळण्याच्या लायकीचा नाहीस!'

या दोन खेळाडूंनी सोडली केकेआरची साथ

लॉकी फग्युर्सन यांने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकीला आयपीएलमध्ये केकेआर संघानं 1.6 कोटींना खरेदी केले होते. त्यानं पाच सामन्यात 10.76च्या इकॉनॉमीनं केवळ दोन विकेट घेतल्या. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू कार्लोस ब्रेथवेटही कोलकाताला रामराम करणार आहे. ब्रेथवेटला कोलकाता संघानं तब्बल 5 कोटींना विकत घेतले होते. त्यानं गेल्या हंगामात केवळ दोन सामने खेळले होते.

वाचा-किंग कोहलीची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी! मास्टर ब्लास्टरच्या विक्रमांना धोका

VIDEO : 'तू देश मेरा' पुलवामा हल्ल्यातील शहिदांसाठी हे गाणं पाहिलं का?

First published: August 15, 2019, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading