BCCI ने केली निवड समितीची घोषणा; आगरकर नव्हे हा माजी क्रिकेटपटू झाला टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर

BCCI ने केली निवड समितीची घोषणा; आगरकर नव्हे हा माजी क्रिकेटपटू झाला टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर

भारतीय क्रिकेट संघाच्या (Team India) निवडसमितीचं प्रमुखपदी कोण याची घोषणा BCCI ने गुरुवारी केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 डिसेंबर :  BCCI ने भारतीय क्रिकेट संघात कोणाकोणाला स्थान द्यायचं हे ठरवणाऱ्या निवड समितीची घोषणा केली आहे. क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटीने घेतलेल्या मुलाखतींनंतर माजी क्रिकेटर चेतन शर्मा (Chetan Sharma Chief Selector)यांची चीफ सिलेक्टर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मादी क्रिकेटपटू अॅबी कुरुविल्ला (Abey Kuruvilla) आणि देवाशिष मोहंती (Debasis Mohanty) यांचाही निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ आता पाच जणांच्या निवडसमितीत सगळेच गोलंदाज सामील आहेत. विशेष म्हणजे यातले चार फास्ट बोलर आहेत. निवड समितीचे उरलेले सदस्य आहेत हरविंदर सिंह आणि सुनील जोशी.

चेतन शर्मा यांनी 1987 च्या विश्वचषक सामन्यात न्यूझिलंडविरुद्ध सलग तीन विकेट्स घेत हॅटट्रिक साधली होती.

आगरकरला संधी नाही

काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार निवड समितीत अजित आगरकरला मोठं स्थान मिळू शकेल अशी शक्यता होती. पण चेतन शर्माची निवड झाल्याने अजित आगरकर यांची संधी गेली, असं समजता येईल. अजित आगरकरखेरीज या चीफ सिलेक्टर पदासाठी मणिंदर सिंग, नयन मोंगिया, एमएस दास आणि राणादेव बोस हेसुद्धा उत्सुक होते आणि त्यांनीही अर्ज दाखल केले होते. पण या सगळ्यांना मागे सोडत चेतन शर्मांनी आघाडी घेतली.

क्रिकेट अॅडव्हायजरी कमिटीने (CAC) निवड समितीत सामील होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मदन लाल यांच्या अध्यक्षतेखाली CAC ने हे काम केलं आणि याच समितीने चेतन शर्मांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. BCCI ने चेतन शर्मांच्या नावाची घोषणा गुरुवारी संध्याकाळी केली.

चेतन शर्माच का?

निवड समितीतल्या इतर सदस्यांमध्ये चेतन शर्मा सगळ्यांत सीनिअर असल्याने त्यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. 54 वर्षीय शर्मा यांनी भारतासाठी 23 टेस्ट आणि 65 वन डे सामने खेळले होते. कसोटी क्रिकेटमध्ये 61 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 67 बळी त्यांच्या नावावर आहेत.

First published: December 24, 2020, 10:01 PM IST

ताज्या बातम्या