BREAKING: भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

BREAKING: भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या मते, याक्षणी कपिल देव धोक्याच्या बाहेर आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. वृत्तानुसार, कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे कपिल देव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या मते, याक्षणी कपिल देव धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवून असून आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. क्रिकेटच्या इतिहासात कपिल देव यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 37 वर्षांपूर्वी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये आपल्या नव्या लुकमुळे कपिल देव चर्चेत होते. त्यांनी कपिल देव यांनी मुंडन करून केवळ दाढी ठेवली होती. कपिल देव यांच्या या लुकचे कौतुक सेलिब्रिटीजनेही केले होते.

कपिल देव यांचे शानदार करिअर

1978मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कपिल देव यांनी 131 कसोटी सामने खेळले आहेत. कपिल देव यांनी न्यूझीलंडचा दिग्गज गोलंदाज रिचर्ड हॅडली यांना सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम मोडला होता. कपिल देव यांच्या नावावर 434 विकेट आहेत. भारताकडून सर्वात जास्त विकेट घेण्याचा विक्रम आजही कपिल देव यांच्या नावावर आहे.

चॅम्पियन कर्णधार

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने 43 धावांनी पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 183 धावा केल्या होत्या, मात्र कपिल देव यांच्या शानदार कामगिरीमुळे वेस्ट इंडीजचा मजबूत संघ केवळ 140 धावा करू शकला.

Published by: Priyanka Gawde
First published: October 23, 2020, 2:35 PM IST
Tags:

ताज्या बातम्या