Breaking: माजी भारतीय क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, व्हेंटिलेटरवर केलं शिफ्ट

Breaking: माजी भारतीय क्रिकेटपटूची प्रकृती बिघडली, व्हेंटिलेटरवर केलं शिफ्ट

गेल्या काही दिवसात अनेक राजकीय नेत्यांपासून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे

  • Share this:

नई दिल्‍ली, 15 ऑगस्ट : माजी भारतीय क्रिकेटर चेतन चौहान यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टम वर ठेवण्यात आले आहे. गेल्या महिन्यांना त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना लखनऊ येथे दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी लढा देत होते..अशातच त्यांना किडनी आणि ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. ज्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय व्यक्तींपासून कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. त्यात यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही कोरोनाची लागण झाली असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच...

Published by: Meenal Gangurde
First published: August 15, 2020, 4:36 PM IST
Tags: criket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading