News18 Lokmat

IPL 2019 : ब्राव्होच्या ‘या’ नव्या गाण्यावर थिरकला वॉटसन

ब्राव्होचं नवं गाणं नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात ब्राव्होनं आशिया खंडातील क्रिकेट संघांचे कौतुक केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 05:40 PM IST

IPL 2019 : ब्राव्होच्या ‘या’ नव्या गाण्यावर थिरकला वॉटसन

नवी दिल्ली, 27 मार्च : आयपीएलमध्ये खरा जोश आणि उत्साह कोणी आणत असतील तर ते वेस्ट इंडिजचे खेळाडू. या खेळाडूंची मॅच संपल्यानंतर त्याचं सेलिब्रशन करण्याची पद्धत तर निराळीच असते. अशाच एका कॅरिबियन स्टार गोलंदाजाच्या एका गाण्यानं सर्वांनाच वेड लावलं आहे. ते गाणं म्हणजे चॅम्पियन... चॅम्पियन. या गाण्यानं DJ ड्वेन ब्राव्होनं संगीत क्षेत्रात दमदार एन्ट्री केली. आता त्याचं नवं गाणं नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात ब्राव्होनं आशिया खंडातील क्रिकेट संघांचे कौतुक केलं आहे. त्यानं गाण्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघाचे आणि संघातील खेळाडूंचे भरभरून कौतुक केले.




 

Loading...





View this post on Instagram




 

The song all my fans been waiting for!!! ASIA @mahi7781 @virat.kohli @safridiofficial @rashid.khan19 @mahela27 @shishir_75 @sangalefthander @ release time #IPL #Champion #DonDWar video by @kalveerbiradar producer @realtimeromie


A post shared by Dwayne Bravo (@djbravo47) on





ब्राव्होच्या याच बहुचर्चित गाण्यावर बुधवारी धडाकेबाज फलंदाज शेन वॉटसनला थिरकण्याचा मोह आवरला नाही. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना चेन्नईनं जिंकल्यानंतर ब्राव्होनं आपल्या या नव्या गाण्यावर वॉटसनला थिरकण्यास भाग पाडले.



आयपीएलच्या या बाराव्या हंगामात चेन्नईनं आतापर्यंतर आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्ली विरुद्धच्या या सामन्यात वॉटसनची तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. वॅटसननं 26 चेंडूत 44 धावांची खेळी केली. याच जोरावर चेन्नईने सामना जिंकला.


VIDEO : प्रीतम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला म्हणून बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 05:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...