पराभवानंतरही तो जिंकला, क्रीडा जगतातील हृदयस्पर्शी VIDEO

पराभवानंतरही तो जिंकला, क्रीडा जगतातील हृदयस्पर्शी VIDEO

थकवा आल्यानं धावपटू ट्रॅकवरच कोसळला त्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूने जे केलं ते पाहून तुम्हीही खिलाडूवृत्तीचं कौतुक कराल.

  • Share this:

मुंबई, 29 सप्टेंबर : खेळात कोणीतरी जिंकतं तर कोणी पराभूत होतं. पण काही खेळाडू हे पराभूत झाल्यानंतरही मन जिंकतात. आयएएएफ वर्ल्ड अॅथलेटिक्स एका धावपटूनं पराभवानंतरही सर्वांचे मन जिंकले. धावण्याच्या शर्यतीत त्याला जिंकता आलं नाही. मात्र, ट्रॅकवर त्यानं केलेल्या कृतीचे जगभर कौतुक होत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयएएएफ वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गिनी-बिसाउचा धावपटू ब्रेमा सुंसर दाबोला पदक जिंकता आलं नाही. 5 हजार मीटरच्या शर्यतीत अरुबाचा धावपटू जोनाथन बुस्बी थकव्यामुळे ट्रॅकवरच कोसळला. दरम्यान, मेडिकल स्टाफने त्याला व्हीलचेअरवर बसवलं. त्यावेळी दाबोनं बुस्बीला उठवलं आणि आधारा दिला. दाबो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याला खांद्याचा आधार देत फिनिश लाइन पार केली.

शर्यत संपल्यानंतर दाबो म्हणाला की, माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्यानंही हेच केलं असतं. दुसऱ्या देशाच्या खेळाडूची मदत करणं सामान्य गोष्ट आहे. शर्यतीवेळी मला माझं रेकॉर्ड मोडता येणार नाही याची जाणीव झाली तेव्हाच मी ठरवलं की फक्त स्वत:साठी धावायचं. त्यावेळी बुस्बीची मदत केली यापेक्षा वेगळं काही केलं नाही.

Navratri 2019: कोल्हापुराच्या अंबाबाईचं पहिलं दर्शन, पाहा LIVE VIDEO

First published: September 29, 2019, 9:50 AM IST
Tags: athletics

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading