ब्रॅड हॉगला उपरती, कोहली आणि क्रिकेट फॅन्सची मागितली माफी

ब्रॅड हॉगला उपरती, कोहली आणि क्रिकेट फॅन्सची मागितली माफी

भारताची क्रिकेट टीम, आणि विशेषत: विराट कोहलीची वादग्रस्त विधानासाठी माफी मागतो

  • Share this:

30 मार्च : रांचीमध्ये रंगलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट सिरिज दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीला दुखापत झाली, त्यामुळे तो शेवटची मॅच खेळू शकला नाही. याच मुद्द्यावरुन  ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ब्रॅड हॉगने वादग्रस्त विधान केलं, पण आता त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे.

ब्रॅड हॉगने ट्विटरवरुन कोहली आणि भारताच्या क्रिकेट फॅन्सची माफी मागितली आहे. त्याचं भारताविषयीचं प्रेमही त्याच्या या माफीनाम्यातून व्यक्त होतं.

ब्रॅड हॉगचा माफीनामा...

"एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून विराटने भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. माझ्या मते देशाचा मान-सन्मान घेऊन मैदानात उतरणे म्हणजे फार मोठी गोष्टी आहे, ही सन्मानाची बाब आहे, एखाद्या खेळाडूला आणखी काय हव असतं. हेच लक्षात ठेऊन मी भारतीय जनता, क्रिकेट फॅन्स, भारताची क्रिकेट टीम, आणि विशेषत: विराट कोहलीची वादग्रस्त विधानासाठी माफी मागतो. कुणाला दु:ख पोचवणं किंवा कोणाचा अपमान करणं हा माझा हेतू नव्हता, हे विधान आईपीएलच्या सन्मानार्थ केलं होतं, ज्या आईपीएलमध्ये खेळण्याचा मी कायम आनंद घेतला. क्रिकेट फॅन्सला माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला याबद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या आणि त्या योग्यही आहेत. मी पून्हा त्या देशाची माफी मागतो, ज्या देशाने मला इतका आनंद दिला आणि विराट कोहली सारख्या प्रेरणादायक खेळाडू विषयी माझ्या मनात काही वाईट नाही, उलट त्याच्याबद्दल सन्मानच आहे."

यावर रविचंद्र अश्विनने त्याची खिल्ली उडवत ट्विट केलं.

"आजच्या दिवसानंतर 30 मार्चला देशाचा माफी दिवस म्हणून साजरा केलं पाहिजे."

First published: March 30, 2017, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading