भारतीय बॉक्सरनं जिंकलं सुवर्ण, यूट्यूब पाहून केली होती तयारी

इंडोनेशियात सुरू असलेल्या 23 व्या प्रेसीडेंट कप बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या बॉक्सर्सनी जबरदस्त कामगिरी नोंदवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2019 03:36 PM IST

भारतीय बॉक्सरनं जिंकलं सुवर्ण, यूट्यूब पाहून केली होती तयारी

जकार्ता, 01 ऑगस्ट : भारताच्या बॉक्सर्सनी इंडोनेशियात सुरु असलेल्या लाबुआन बाजो इथल्या 23 व्या प्रेसीडेंट कप बॉक्सिंग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सहावेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेली भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम आणि सिमरनजीत कौर यांनी सुवर्णपदक पटकावलं.

पंजाबची असलेल्या सिमरनजीतसाठी हे सुवर्ण खूप मोठी गोष्ट आहे. तिनं ज्या वजनी गटात हे मिळवलं त्यात नुकतंच खेळायला सुरूवात केली होती. सुवर्ण पदक पटकावल्यानंतर सिमरनजीतनं खुलासा केला की, यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तयारी केली होती. सिमरनजीतने स्पर्धेच्या आधी प्रतिस्पर्धी खेळाडूंचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहिले आणि त्यानुसार तयारी केली. या व्हिडिओचा फायदा झाला असून आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावण्याचं ध्येय असल्याचं तिनं सांगितलं.

सिमरनजीतने 60 किलो वजनीगटामध्ये अंतिम सामन्यात हसानाह उस्वातुन हिला पराभूत केलं. आशियाई खेळात हसानाहनं कांस्यपदक पटकावलं होतं. तिला 5-0 ने पराभूत करून सिमरनजीतनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. नव्या वजनी गटात खेळायचं असल्यानं नेहमीपेक्षा जास्त तयारी केली होती. यूट्यूबवर प्रतिस्पर्ध्यांच्या लढती पाहून तयारी केल्याचंही सिमरनजीत म्हणाली.

बाद होताच पोलार्डनं ब्राव्होच्या पोटावर मारली बॅट, पाहा VIDEO

क्रिकेटमध्ये 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, माजी मुख्यमंत्री EDच्या रडारवर

Loading...

VIDEO: TIKTOKचा छंद तरुणाच्या अंगलट, बाईक अंगावर पडून गंभीर जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Boxing
First Published: Aug 1, 2019 03:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...