Home /News /sport /
महिला दिनी पूजा राणीचं मोठं यश, 2020 च्या ऑलिम्पिकसाठी पात्र, कृष्णाही जिंकला
महिला दिनी पूजा राणीचं मोठं यश, 2020 च्या ऑलिम्पिकसाठी पात्र, कृष्णाही जिंकला
जागतिक महिला दिनी भारताची महिला बॉक्स पूजा राणीनं तमाम भारतीयांना आणि प्रामुख्याने देशभरातल्या महिलांना मोठी भेट दिली आहे.
जॉर्डन, 8 मार्च: जागतिक महिला दिनी भारताची महिला बॉक्स पूजा राणीनं तमाम भारतीयांना आणि प्रामुख्याने देशभरातल्या महिलांना मोठी भेट दिली आहे. जॉर्डनच्या अम्मानमध्ये झालेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत 75 किलो वजनी गटात पूजाने थायलंडच्या पोर्निपी चुटे हिचा पराभव केला. या विजयासोबतच पूजाने 2020 च्या टोकियो इथे होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारती बॉक्सर होण्याचा मान पूजा राणी हिने मिळवला आहे. पूजाने प्रतिस्पर्धी थायलंडच्या पोर्निपी चुटे हिचा 5 विरुद्ध शून्य असा जबरदस्त पराभव केला. आपल्यापेक्षा वयाने कमी असलेल्या पोर्निपीचा पूजाने आक्रमक खेळ करून पराभव केला. गेल्या वर्षी आशियाई बॉक्सिंग विजेतेपदाच्या स्पर्धेत 81 किलो गटात खेळून पूजाने सुवर्णपदकाची कमाई केली होती. गट बदलल्यानंतर मोठं यश यावेळी जागतिक स्पर्धेत 81 किलोच्या ऐवजी 75 किलो वजनी गटात खेळूनही जोरदार कामगिरी केली आहे. आशियाई विजेतेपदानंतर पूजाला जागतिक विजेतेपद मिळालं, मात्र दोन वर्ष हुलकावणी देत होते. यानंतर पूजाने आपल्या केळात काही मदत्त्वपूर्ण बदल केले आणि तिच्या 81 किलो वजनी गटात खेळण्याच्या ऐवजी कमी वजनी गटात म्हणजे 75 किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला. यासाठी पूजाराणीने कठोर मेहनत घेतली. तिने आपलं वजन कमी केलं आणि पूजाने 75 किली वजनी गटात खेळायला सुरुवात केली. याचा तिला मोठा फायदा झाल्याचं दिसत आहे. थायलंडच्या पोर्निपी चुटेने आक्रमक सुरुवात केली. पण अनुभवाच्या जोरावर योग्य वेळी आक्रमक होत पूजाने अतिशय उत्तम खेळ केला.
#SheInspiresUs:
Pooja Rani becomes the first Indian boxer to qualify for #Olympics2020.
She defeated Chutee Pornnipa (THA) in the Asian Boxing Qualifiers being held in Amman, Jordanpic.twitter.com/yoaxk8lipl
— All India Radio News (@airnewsalerts) March 8, 2020
विकासने जपानच्या सेव्होनोरॅटस ओझाकाला 69 किलो वजनी गटात पराभूत केलं आणि भारताच्या वतीने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान पटकावला.
विकासने जपानच्या सेव्होनोरॅटस ओझाकाला पाच शून्य अशा फरकाने पराभूत केलं. महत्वाचं म्हणजे विकासने तिसऱ्यांदाचा ऑलिप्मिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला भारतीय पुरूष बॉक्सर ठरला आहे.
Ticket to #Tokyo2020-2⃣
🇮🇳Tank @officialvkyadav ensures his third #Olympic appearance as he crushed his opponent from 🇯🇵 with a unanimous verdict to become the first Indian male and second 🇮🇳 boxer to qualify for #Olympics2020. Way to go Champ.👏👏👏#PunchMeinHaiDum#boxing pic.twitter.com/pdiJeEj78f
— Boxing Federation (@BFI_official) March 8, 2020
First published:
पुढील बातम्या