पक्षपात होऊ नये म्हणून मेरी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीच्या बैठकीला गैरहजर

पक्षपात होऊ नये म्हणून मेरी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवडीच्या बैठकीला गैरहजर

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. यासाठी निवड करणाऱ्या समितीमध्ये मेरी कोम होती पण अंतिम बैठकीसाठी ती उपस्थित राहिली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार शनिवारी जाहीर करण्यात आले. त्यानंतर अनेक खेळाडूंनी पुरस्कार न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये बॅडमिंटनपटून एचएस प्रणॉयनं अर्जुन पुरस्कार न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. तर अभिनव बिंद्रानं त्याच्या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार न दिल्यानं निवड समितीला धारेवर धरलं आहे. दरम्यान, भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने पुरस्कारांच्या निवडीची चर्चा सुरू असताना बैठकीत अनुपस्थित राहिली.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या 12 सदस्यांमध्ये मेरी कोमसुद्धा आहे. सदस्यांची बैठक सुरू असताना द्रोणाचार्य पुरस्कार देण्याबाबत तिच्याच प्रशिक्षकांचे नाव समोर आलं. द्रोणाचार्य पुरस्काराच्या यादीत आपल्याच प्रशिक्षकाचं नाव टाकल्याबद्दल मेरी कोमवर टीकाही झाली. मात्र ज्यावेळी तिच्या प्रशिक्षकांच्या नावावर चर्चा सुरू झाली तेव्हा बैठकीतून बाहेर राहण्याचा निर्णय मेरी कोमनं घेतला.

मेरी कोमने शनिवारी झालेल्या अंतिम बैठकीत भाग घेतला नव्हता. यामागे तिच्या प्रशिक्षकांचे नाव पुरस्काराच्या यादीत होतं हे कारण आहे. यादीत आपल्याच प्रशिक्षकाचे नाव असल्यानं पक्षपातीपणाचा आरोपही तिच्यावर झाला. तेव्हा मेरी कोमनं समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचाही निर्णय घेतला होता. बॉक्सिंक फेडरेशनने छोटे लाल यादव यांचे नाव मेरी कोमच्या सल्ल्यानंच पाठवलं होतं.

पुरस्कार निवड समितीमध्ये मेरी कोमशिवाय माजी फुटबॉलपटू बायचुंग भूतिया, अॅथलीट अंजु बॉबी जॉर्ज, माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, टेबल टेनिस प्रशिक्षक कमलेश मेहता यांचा समावेश आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मुकुंदन शर्मा, क्रीडा सचिव राधेश्याम झुलानिया, क्रीडा महासंचालक संदीप प्रधान आणि टॉप्सचे मुख्य कार्यकारी कमांडर राजेश राजगोपालन हेसुद्धा समितीमध्ये आहेत.

'माय नेम इज यश खान', मुस्लीम आडनावामुळे पिंपरी पोलिसांकडून नाट्य कलाकाराची झडती!

Published by: Suraj Yadav
First published: August 18, 2019, 10:07 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading