हिंमत असेल तर माझ्याशी लढ, पाकिस्तानी वंशाच्या बॉक्सरला विजेंदरचं आव्हान

दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या आमिर खानने भारतीय बॉक्सर जास्त वेळ लढू शकत नाहीत असं म्हटलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 10:41 AM IST

हिंमत असेल तर माझ्याशी लढ, पाकिस्तानी वंशाच्या बॉक्सरला विजेंदरचं आव्हान

नवी दिल्ली, 19 जुलै : व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये उतरलेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या विजेंदर सिंहची विजयी घौडदौड मेकिराच्या माइक स्नायडरविरुद्ध कायम राहिली. विजेंदरने या विजयानंतर पाकिस्तानी वंशाचा बॉक्सर आमिर खानला आव्हान दिलं आहे.

आमिरने अनेकवेळा विजेंदरवर टीका केली आहे. त्याने विजेंदरच्या करिअरच्या सुरुवातीला भारतीय बॉक्सर जास्त वेळ लढू शकणार नाही असं म्हटलं होतं. विजेंदरला आव्हान देताना आमिर खान म्हणाला होता की, विजेंदरला त्याची भीती आहे. यामुळे त्याचा कोणी सामना करू शकत नाही.

अमेरिकेतून परतल्यानंतर विजेंदर म्हणाला की, मी आमिरशी लढायला तयार आहे. तुम्ही त्याच्याशी चर्चा करा, सध्या तो लहान मुलांशी लढतो आही. त्यानं ज्यूनियर बॉक्सरला हरवलं आहे. मी आधीही बोललो होतो आताही सांगत आहे मी तयार आहे. मला फक्त सांगा तो कधी तयार आहे.

धोनीला सचिन, सेहवाग आणि मी एकाचवेळी संघात नको होतो; गंभीरचा खळबळजनक खुलासा

विजेंदर आणि आमिर या दोघांचाही वजन गट वेगळा असल्यानं अडचण येऊ शकते. त्यावर विजेंदर म्हणाला की, या लढतीसाठी मी वजन कमी करायला तयार आहे पण आमिरला वजन वाढवावं लागेल. येत्या वर्षात आणिखी दोन लढती खेळणार आहे. पुढच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याचा प्रयत्न करेन असंही विजेंदर म्हणाला. पाकिस्तानी वंशाचा असलेला ब्रिटीश बॉक्सर आमिर खानने दोनवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरला आहे. तर विजेंदरला अद्याप एकही वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धा खेळलेला नाही.

Loading...

मास्टर ब्लास्टरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ICCनं 'हा' सन्मान देऊन केला गौरव

फेसबुकवर FaceApp Challengeची धूम; काय आहे चॅलेंज?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...