World Boxing Championship 2019 : बॉक्सर अमितचा ऐतिहासिक पंच! जागितक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारा अमित पहिला खेळाडू ठरला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 04:52 PM IST

World Boxing Championship 2019 : बॉक्सर अमितचा ऐतिहासिक पंच! जागितक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

ईकॅटरिनबर्ग, 20 सप्टेंबर : विनेश फोगोटनं ऑलिम्पिकचे तिकीट मिळवल्यानंतर आता बॉक्सिंगमध्ये भारताच्या अमित पांघलनं नवा इतिहास रचला आहे. 52 किलो वजनी गटात जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत अमितनं उपांत्य फेरीत काझाकस्तानच्या साकेन बिबोसीनोव्हचा 3-2नं पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारा अमित पहिला खेळाडू ठरला आहे.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत आतापर्यंत भारताला एकदाही दोन पदके पटकावता आली नव्हती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा अमित हा पहिला खेळाडू ठरला आहे. दरम्यान त्याच्यासोबत स्पर्धेत असलेल्या भारताच्या मनिष कौशिकला मात्र 63 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

अमितनं 2018च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तर, 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

Loading...

कौशिकचा पराभव क्युबाच्या अव्वल मानांकित अँडी गोमेझ क्रूझनं केला. क्रूझने 2017च्या जागतिक स्पर्धेत 64 किलो गटात सुवर्णपदक तसेच पॅन अमेरिकन स्पर्धेत दोन वेळा विजेता होण्याचा मान पटकावला होता.

आतापर्यंत जागतिक स्पर्धेत विजेंदर सिंग (2009), विकास कृष्णन (2011), शिवा थापा (2015) आणि गौरव बिदुरी (2017) यांनी भारताला पदके मिळवून दिली आहेत.

खड्डे बुजवण्याचा भन्नाट पुणेरी जुगाड! झाडांचा चिक, गूळ चुन्याचं मिश्रण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...