या बॉलरची ऍक्शन पाहून सगळेच हैराण, पाचवेळा फिरवतो हात, भज्जीने शेयर केला VIDEO

या बॉलरची ऍक्शन पाहून सगळेच हैराण, पाचवेळा फिरवतो हात, भज्जीने शेयर केला VIDEO

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. विचित्र बॉलिंग ऍक्शन असलेल्या या बॉलरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च : आयपीएलचं (IPL 2021) वारं आता वाहू लागलंय. गेल्या महिन्यात त्यासाठी खेळाडूंचा लिलाव झाला. 9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलला सुरूवात होणार आहे, त्यासाठी खेळाडूंनी मैदानावर सराव सुरू केला आहेच पण काही जणं सोशल मीडियावरही अधिक सक्रिय झाले आहेत. त्यापैकी एक आहे भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंग (Harbhajan Singh). तसा तो सोशल मीडियावर सक्रिय असतोच. हरभजननी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये हरभजनच्या बॉलिंग स्टाइलशी साधर्म्य असलेला खेळाडू बॉलिंग करताना दिसतो आहे. हा बॉलर पाचवेळा हातांची हालचाल करून मग बॉल टाकतो आहे. त्यामुळे ती पद्धत खूपच विचित्र (strange bowling action) वाटते आहे. हरभजननी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram Post) शेअर केला असून लिहिलंय, ‘ माझ्या बॉलिंग ॲक्शनचं अधिक चांगलं व्हर्जन. धन्यवाद @gagangujrals मला हे पाठवल्याबद्दल. बॉल फिरेल का माहिती नाही, पण डोकं मात्र गरगरलं.’

View this post on Instagram

A post shared by Harbhajan Turbanator Singh (@harbhajan3)

बॉलिंगची ही पद्धत पाहिल्यावर तुम्हालाही खूप हसू येईल. त्या व्हिडिओतला बॅट्समनही ही बॉलिंग ऍक्शन पाहून चक्रावला आणि  स्टंपपासून मागे गेला. युवराजसिंगने (Yuvraj Singh) हरभजनच्या या व्हिडिओवर पोस्ट टाकत म्हटलंय, ‘हायब्रीड व्हर्जन.’ म्हणजे हरभजनच्या गोलंदाजीचं ते हायब्रीड व्हर्जन आहे. हा व्हिडिओ हरभजननी शेअर केल्यामुळे खूप पाहिला जातोय आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यावर पडत आहेत.

यावर्षी IPL मध्ये KKR कडून खेळेल भज्जी

आयपीएल 2020 मध्ये कोरोनामुळे हरभजनसिंगने स्पर्धेतून माघार घेतली होती, पण या वर्षी मात्र त्याची बॉलिंग रसिकांना पहायला मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) हरभजनला त्याच्या 2 कोटी रुपये या बेस प्राइजला विकत घेतलं आहे. 2019 च्या आयपीएलमध्ये हरभजन चेन्नई सुपर किंग्ज संघातून खेळला होता.

आंतरराष्ट्रीय सामना खेळला 2016 मध्ये

हरभजन सिंगने 2016 मध्ये भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पदार्पण करणाऱ्या हरभजनने 103 टेस्टमध्ये 417, 236 एकदिवसीय सामन्यात 269 तर 28 टी-20 सामन्यांत 25 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय आयपीएलमधील 160 सामन्यांत त्याने 150 विकेट्स घेतल्या.

First published: March 12, 2021, 7:39 PM IST

ताज्या बातम्या