• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • एका बाऊन्सरने बदललं क्रिकेटपटूचं नशीब, थेट नॅशनल टीममध्ये एन्ट्री

एका बाऊन्सरने बदललं क्रिकेटपटूचं नशीब, थेट नॅशनल टीममध्ये एन्ट्री

एका बॉलने बदललं क्रिकेटपटूचं आयुष्य

एका बॉलने बदललं क्रिकेटपटूचं आयुष्य

क्रिकेट (Cricket) असा खेळ आहे, ज्यात अनेकवेळा एक बॉल खेळाडूला रातोरात सुपरस्टार बनवू शकतो. असंच काही गुलशन झासोबत (Gulshan Jha) झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 22 ऑगस्ट : क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात अनेकवेळा एक बॉल खेळाडूला रातोरात सुपरस्टार बनवू शकतो. असंच काही गुलशन झासोबत (Gulshan Jha) झालं आहे. सप्टेंबर महिन्यात अमेरिका आणि ओमानविरुद्धच्या ट्रायसीरिजसाठी नेपाळ (Nepal) टीममध्ये गुलशनची निवड झाली आहे. ही ट्रायसीरिज ओमानमध्ये 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. गुलशनने आतापर्यंत फक्त 2 स्थानिक मॅच खेळल्या आहेत. तरीही त्याला निवड समितीला प्रभावित करण्यात यश आलं, त्यामुळे त्याची राष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. गुलशन स्थानिक क्रिकेटमध्ये नेपाळ पोलिसांच्या टीमकडून खेळतो. यावर्षी काठमांडू मेयर्स कपच्या 2 मॅचमध्ये तो खेळला. आर्म्ड पोलीस फोर्स क्लबविरुद्ध त्याने एका मॅचमध्ये शानदार बॉलिंग केली. गुलशनच्या वेगाने विरोधी टीमच्या बॅट्समनना अडचणीत टाकलं. 7 ओव्हरमध्ये 36 रन देऊन त्याने 4 विकेट घेतल्या आणि आपल्या टीमला 8 विकेटने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. गुलशन याच्या बाऊन्सरचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. याच स्पर्धेत गुलशनने काठमांडू मेयर्स इलेव्हनचा बॅट्समन खडक बोहोराचा वेगवान बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर खडकच्या हेलमेटजवळून बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या वेगाने गेला. ओमानमध्ये होणाऱ्या ट्रायसीरिजसाठी नेपाळ टीमचं नेतृत्व ज्ञानेंद्र मल्ला करणार आहे, तर दीपेंद्र सिंग उपकर्णधार असेल. या ट्रायसीरिजआधी नेपाळ पपुआ न्यू गिनीविरुद्ध आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग-2 च्या दोन वनडे खेळणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: