• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : मुंबईत जन्मला, मग न्यूझीलंडला गेला, आता भारताविरुद्धच खेळणार

WTC Final : मुंबईत जन्मला, मग न्यूझीलंडला गेला, आता भारताविरुद्धच खेळणार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून सुरू होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 जूनपासून सुरू होणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा मुकाबला होईल. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या एका खेळाडूला संधी मिळू शकते, ज्याचा जन्म भारतात झाला. डावखुरा स्पिनर एजाज पटेल (Ajaz Patel) याचा जन्म मुंबईमध्ये 21 ऑक्टोबर 1988 साली झाला. 8 वर्षांपर्यंत तो मुंबईतच राहिला, पण नंतर कुटुंबासोबत न्यूझीलंडला स्थायीक झाला. यानंतर आता तो आपल्याच देशाच्या टीमविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळताना दिसू शकतो. या सामन्यात आपल्याच देशाच्या खेळाडूंविरुद्ध खेळणं कठीण जाईल, अशी प्रतिक्रिया एजाज पटेलने दिली आहे. एजाज पटेलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तो ज्या देशात जन्म झाला त्यांच्याचविरुद्ध खेळणं सोपं जाणार नाही, पण हा अनुभव वेगळा असेल. आयुष्यभर हे लक्षात राहिल, असं म्हणतोय. एजाज पटेलने 2018 साली टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं, पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात एजाजने 7 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. एजाज पटेल आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. आतापर्यंत खेळलेल्या 8 टेस्टमध्ये त्याने एकूण 22 विकेट घेतल्या आहेत. एजाजची इंग्लंडविरुद्धची दोन टेस्ट मॅचची सीरिज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी न्यूझीलंडच्या टीममध्ये निवड झाली आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult), नील वॅगनर (Neil Wagner) आणि टीम साऊदी (Tim Southee) यांच्यासारखे फास्ट बॉलर आणि ऑलराऊंडर काईल जेमिसन (Kyle Jamieson) आहे, त्यामुळे एजाज पटेलला अंतिम-11 मध्ये संधी मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: