मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा इतिहास काय? आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वरचढ कोण?

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा इतिहास काय? आतापर्यंत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वरचढ कोण?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका आहे. यातील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असं नाव का पडलं? केव्हापासून ही ट्रॉफी दिली जाते? यासारखे प्रश्न या मालिकेबद्दल अनेकांच्या मनात असतील.

भारतीय क्रिकेट संघाने 1947 ते  1992 या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 कसोटी सामने खेळले होते. 1996 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज एलन बॉर्डर यांच्या क्रिकेटमधील योगदानाचा गौरव करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसारच भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नाव देण्यात आलं.

सुनील गावस्कर यांनी भारताकडून तर एलन बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत 10 हजार धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणारे दोघेही आपआपल्या देशाचे पहिले क्रिकेटपटू होते. बराच काळ हा विक्रम दोघांच्या नावावर होता. बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीत मालिका बरोबरीत राहिल्यास चषक आधीच्या विजेत्याकडे कायम राहतो.

हेही वाचा : ऑस्ट्रेलियाला टी२० वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा

वरचढ कोण? ऑस्ट्रेलिया की भारत

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे आयोजन 1996 मध्ये पहिल्यांदा करण्यात आले होते. तेव्हा फक्त एकाच कसोटीची मालिका झाली होती. अशी मालिका पहिली आणि शेवटची होती. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला सात विकेटने धूळ चारली होती. आतापर्यंत बॉर्डर - गावस्कर ट्रॉफीअंतर्गत 15 मालिका दोन्ही देशात खेळण्यात आल्या. यात 8 वेळा भारतात तर 7 वेळा ऑस्ट्रेलियात आयोजन केले होते.

भारताने 9 वेळा मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियाला 5 वेळा विजय मिळवता आला. फक्त 2004-04 मध्ये एकमेव मालिका बरोबरीत राहिली. आतापर्यंत 52 कसोटीत भारताने 22 आणि ऑस्ट्रेलियाने 19 सामने जिंकले. तर 11 सामने अनिर्णित राहिले. भारतात ऑस्ट्रेलियाने अखेरची कसोटी मालिका 2004-05 मध्ये जिंकली होती. ऑस्ट्रेलिया 2012 नंतर भारतात कसोटी जिंकणारा एकमेव पाहुणा संघ आहे. त्यांनी पुण्यात झालेल्या 2016-17 मधील मालिकेत पहिल्या सामन्यात भारताला 333 धावांनी हरवलं होतं.

First published:

Tags: Cricket