Shakib-Al-Hasan Match Fixing : शाकिबच्या मॅच फिक्सिंग प्रकरणी नवा खुलासा, समोर आलं IPL कनेक्शन

बांगलादेशचा 32 वर्षीय ऑलराऊंडर शाकिब-अल-हसनवर आयसीसीनं दोन वर्षांची बंदी घातली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 09:38 AM IST

Shakib-Al-Hasan Match Fixing : शाकिबच्या मॅच फिक्सिंग प्रकरणी नवा खुलासा, समोर आलं IPL कनेक्शन

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : बांगलादेशचा 32 वर्षीय ऑलराऊंडर शाकिब-अल-हसनवर आयसीसीनं दोन वर्षांची बंदी घातली आहे. शाकिबवर ही बंदीची कारवाई मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाल्याची गोष्ट लपवून ठेवल्याबद्दल करण्यात आली आहे. बांगलादेशच्या कसोटी आणि टी20 संघाचा कर्णधार असलेल्या शाकिब अल हसनने आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली नव्हती. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं स्वीकारलं आहे. त्यानंतर शाकिबवर आयसीसीने बंदीची कारवाई केली.

दरम्यान, शाकिबला तीन वेळा मॅच फिक्सिंगची ऑफर दिल्याचा आरोप आयसीसीनं केला होता. यातील एक प्रकरण हे आयपीएल 2018मधील आहे. आयसीसीनं दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2018मध्ये 26 एप्रिलला खेळल्या गेलेल्या सामन्यात शाकिबला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. हा या स्पर्धेचा 25वा सामना होता, जो सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला होता. शाकिब आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो.

वाचा-ICC चा दणका, भारत-बांगलादेश दौऱ्याआधी अष्टपैलू खेळाडूवर बंदीची कारवाई

आयपीएल 2018मधल्या या सामन्यात शाकिबला दीपक अग्रवाल नावाच्या व्यक्तीनं संपर्क केला होता. यात शाकिब आणि दीपक यांचे व्हॉट्सअॅप मेसेज आता समोर आले आहे. दरम्यान शाकिबनं दावा केला आहे की दीपकला त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. मात्र आयसीसीनं ही गोष्ट लपवल्याच्या आरोपावरून शाकिबवर दोन वर्षांची बंदी घातली आगे.

व्हॉट्सअॅपनं केला शाकिबचा घात

Loading...

आयपीएल 2018मध्ये शाकिब जेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबविरोधात मैदानात उतरत होता, त्याआधी त्याच्याशी दीपक अग्रवाल नामक व्यक्तीनं संपर्क केला होता. यावेळी व्हॉट्सअॅप मेसेज करत त्यानं प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणते खेळाडू आहेत, असे विचारले. याचबरोबर त्याच दिवशी शाकिबनं काही मजकूर डिलीटही केला होता. दरम्यान शाकिबनं दीपकला संघासंदर्भात कोणतीही माहिती दिली नसल्याचे सांगितले आहे.

वाचा-दिग्गज क्रिकेटपटूनं लपवली फिक्सिंगची ऑफर, ICC करणार मोठी करवाई

आयपीएल आणि मॅच फिक्सिंग

आयपीएल आणि वाद यांचे जुने संबंध आहेत. आयपीएल आणि मॅच फिक्सिंगची ही पहिली घटना नाही आहे. याआधीही आयपीएलमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळं टीम इंडियाचा जलद गोलंदाज एस. श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा शाकिबच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा आयपीएल आणि वाद समोर आले आहे. आयपीएलच्या पहिल्या काही स्पर्धांमध्ये शाकिब कोलकाता संघाकडून खेळत होता. त्यानंतर हैदराबाद संघानं शाकिबला विकत घेतले. जगातला सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या शाकिबचे क्रिकेट करिअर या सगळ्या प्रकरणांमुळे धोक्यात येऊ शकते.

वाचा-क्रिकेटविश्वाला मिळाल नवा सेहवाग; 36 चौकार, 5 षटकारांसह ठोकल्या नाबाद 261 धावा!

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 09:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...