Home /News /sport /

ऋषभ पंत - उर्वशी रौतलाच्या नात्यात का झाला दुरावा? whatssapp ब्लॉकचं खरं कारण उघड

ऋषभ पंत - उर्वशी रौतलाच्या नात्यात का झाला दुरावा? whatssapp ब्लॉकचं खरं कारण उघड

Rishabh pant

Rishabh pant

क्रिकेट जगतात सध्या यष्टीरक्षक ऋषभ पंतची (Rishabh pant) हवा पाहायला मिळत आहे. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या (INDvsSl) कसोटी सामन्यात टीम इंडियाने 238 धावांनी विजय मिळवला. भारताच्या मालिका विजयानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या नावाची चर्चा अधिक रंगली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली,16 मार्च: क्रिकेट जगतात सध्या यष्टीरक्षक ऋषभ पंतची (Rishabh pant) हवा पाहायला मिळत आहे. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या (IND vs Sl) कसोटी सामन्यात टीम इंडियाने 238 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 अशी मालिका विजयाची नोंद केली. या सामन्यादरम्यान ऋषभ पंतने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. पंतन 2021 पासून कसोटी क्रिकेटमध्ये 1077 धावा केल्या आहेत. या कालावधीत भारतासाठी सर्वाधिक धावा करणार तो फलंदाज ठरला आहे. तर महेंद्रसिंह धोनीचाही विक्रम त्याने मोडला आहे. क्रिकेटच्या वर्तुळात फार्मात असलेला पंत सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला आहे. सध्या त्याच्या आणि उर्वशी रौतेलाच्या अफेअरच्या चर्चेला उत आला आहे. काही दिवसांपूर्वी रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) यांच्या अफेअर्सच्या चर्चा मोठ्या जोरात सुरु होत्या. डेट वर जाताना पंत आणि उर्वशीचे फोटो व्हायरल रिषभ पंत आणि उर्वशी रौतेला यांना 2019 साली मुंबईच्या जुहूमधील एका हॉटेलमध्ये जाताना काही फॅन्सनी पाहिलं होतं. लेट नाईट डिनरसाठी रिषभ आणि रौतेला हॉटेलमध्ये गेले होते. ज्यानंतर त्यांच्यात खास रिलेशन असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. रौतेला आणि रिषभचे काही फोटोज देखील त्यावेळी व्हायरल झाले होते. यानंतर मीडिया रिपोर्टनुसार, रिषभने कानाला खडा लावत उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर त्यांची भेट झाली नाही. रिषभने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं रिषभ पंत श्रीलंका दौऱ्यावर होता. मात्र तिथे त्याचा परफॉर्मन्स म्हणावा असा होत नव्हता. त्यामुळे अंतिम 11 मध्ये त्याची जागा फिक्स होत नव्हती. याच टेंशनमधून त्याने उर्वशीला व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केलं होतं, अशी चर्चा रंगली होती. सध्या इशासोबत रिलेशनशीपमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत सध्या त्याची मैत्रीण इशा नेगी सोबत रिलेशीपमध्ये आहे. इशा देहरादूनची रहिवासी आहे. तिने इंटेरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलंय. इन्स्टाग्रामवर ती फारच अॅक्टिव्ह असते. रिषभने तिच्यासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. ऋषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करेल ऋषभ पंत आता 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल सीझन 15 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. यंदाच्या आयपीएलला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Rishabh pant, Urvashi rautela

    पुढील बातम्या