सट्टा लावल्या प्रकरणी अर्जुन रामपालच्या मेव्हण्याला अटक

सट्टा लावल्या प्रकरणी अर्जुन रामपालच्या मेव्हण्याला अटक

अमित अजित गिल असं या आरोपीचे नाव असून आॅगस्ट महिन्यात भारत - श्रीलंका मॅचवर अमित गिलने सट्टा लावला होता.

  • Share this:

27 सप्टेंबर : बाॅलिवूडचा अभिनेता अर्जुन रामपालच्या कथित मेव्हण्याला मुंबई क्राईम ब्राँचनं सट्टा लावल्या प्रकरणी अटक केलीये. अमित अजित गिल असं या आरोपीचे नाव असून आॅगस्ट महिन्यात भारत - श्रीलंका मॅचवर अमित गिलने सट्टा लावला होता. अमितला मुंबईतील किला कोर्टात हजर केले असता त्याला ३ आॅक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

आॅगस्ट महिन्यात भारत-श्रीलंका मॅचवर सट्टा लावणाऱ्या ३ सट्टेबाजांना मुंबई क्राईम ब्रांचने अंधेरी येथील एका आलिशान प्लॅट मधून अटक केली होती. तेव्हा या बुकींकडून मुंबई पोलिसांनी लॅपटाॅप आणि मोबाईल जप्त केले होते. विशेष म्हणजे या बुकींनी आपण पकडलो जाऊ नये म्हणून एक साॅफ्टवेअर तयार केलं होतं तसंच बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांनी सिमकार्ड विकत घेतले होते. हे तपासात समोर आलं होतं. त्याचा मोबाईल नंबर आणि व्हाॅईस रेकाॅर्डींग पोलिसांना मिळाली होतं. त्याआधारे मुंबई क्राईम ब्रांचने अमित गिलला तपासाअंती आज अटक केली.

अमित गिलला अटक करुन आज मुंबई किला कोर्टात हजरत्याचा अटक केलेल्या ३ बुकींशी संबंध आहे का, अमितने त्याच्या मोबाईलवरून सट्टा लावला होता, त्याकरता त्याच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे, किती पैशांचा व्यवहार झाला होता? अमित फक्त सट्टा लावायचा की सट्टा देखील घ्यायचा?  या प्रश्नांचा तपास करायचा असल्याने अमितच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकीलांनी केली असता युक्तीवादांनंतर अमित गिलची ३ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी कोर्टाने रवानगी केली. पण, मीडियात ज्या बातम्या येत आहेत, ज्या बाॅलिवूड अभिनेत्याशी माझा संबंध जोडला जातोय त्याच्याशी माझा काहीही संबंध नसल्याचा दावा अमित गिलने केलाय.

First published: September 27, 2017, 11:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading