मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

महिला गोल्फर खेळाडूचं मासिक पाळीबद्दल बोल्ड भाष्य; पत्रकाराची बोलती झाली बंद

महिला गोल्फर खेळाडूचं मासिक पाळीबद्दल बोल्ड भाष्य; पत्रकाराची बोलती झाली बंद

अजूनही मासिक पाळीबद्दल बोलताना उघडपणे सर्व गोष्टी बोलल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा एक व्यावसायिक गोल्फर आपल्या सामन्यानंतरच्या मुलाखतीत या विषयावर बोलली, तेव्हा तिला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालादेखील याबद्दल बोलणं अवघड झाला होतं.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 4 मे : मासिक पाळी (Periods) हा महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि तितकाच वेदनायुक्त काळ असतो. मासिक पाळीबद्दल अजूनही अनेक ठिकाणी समाज प्रबोधनाची गरज आहे; मात्र या विषयवार फारसं बोललं जात नाही. अजूनही मासिक पाळीबद्दल बोलताना उघडपणे सर्व गोष्टी बोलल्या जात नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा एक व्यावसायिक गोल्फर आपल्या सामन्यानंतरच्या मुलाखतीत या विषयावर बोलली, तेव्हा तिला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालादेखील याबद्दल बोलणं अवघड झाला होतं. न्यूझीलंडची प्रोफेशनल गोल्फर लिडिया को (New Zealand Professional Golfer Lydia Ko) हिचा याबाबतचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. याबद्दलचं वृत्त 'द इंडियन एक्सप्रेस'ने दिलं आहे. लिडिया को ही न्यूझीलंडची एक प्रोफेशनल गोल्फर आहे. 2022 च्या पालोस वर्देस चॅम्पियनशिपमध्ये (2022 Palos Verdes Championship) लिडिया को हिला मरीना अ‍ॅलेक्सने (Marina Alex) दोन स्ट्रोकमध्ये पराभूत केले. परंतु लिडियाने मासिक पाळीबद्दल जे भाष्य केले, त्यामुळे तिने नेटकऱ्यांचं मन मात्र जिंकलं आहे. अंतिम फेरीदरम्यान 25 वर्षीय लिडिया तिच्या फिजिओथेरपिस्टकडून पुन्हा पाठ चेपून घेताना दिसली. गोल्फ चॅनलच्या जेरी फोल्ट्झने (Golf Channel’s Jerry Foltz) तिला विचारलं, की तिला सामन्याच्या शेवटच्या फेरीत फिजिओथेरपीची गरज का भासली? पुढे जाण्याच्या चिंतेपोटी असं घडलंय का? मुलाखतीत विचारल्या गेलेल्या या प्रश्नाचं लिडियाने बेधडकपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, "असं नाहीये. माझ्यासाठी तो महिन्यातला ठरावीक काळ होता. मला माहीत आहे, की हे पाहत असलेल्या सर्व महिलांनी मला काय म्हणायचं आहे ते अचूक हेरलं असेल." याबद्दल ती पुढे स्पष्टपणे म्हणाली, "मासिक पाळी आरामदायी नसते आणि त्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. म्हणून जेव्हा मी या काळातून जात असते, तेव्हा माझी पाठ खूप दुखते आणि वेदना होतात. ख्रिसने मला अशा परिस्थितीत पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे तो आल्यावर मला खूप बरं वाटलं." हे ही वाचा-66व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले अरुण लाल, पत्नी 28 वर्ष लहान, लग्नाचे Unseen Photos लिडियाने तिच्या उत्तरानंतर सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले; मात्र तिला प्रश्न विचारणाऱ्या रिपोर्टरला यावर काय बोलावे हे सुचले नाही. त्यामुळे त्यानंतर तो केवळ धन्यवाद म्हणाला. यानंतर लिडियाला तिचं हसू आवरले नाही आणि ती त्या पत्रकाराला म्हणाली, “मला माहीत आहे, की तुला आता शब्द सुचत नसतील. हे असंच आहे ना?” या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर फोल्ट्झने सोशल मीडियावर अनेकांना प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने हे अधोरेखित केलं, की सामान्यपणे फोल्ट्झ खेळाडूंना भावनिक करत असतो. परंतु या वेळी नेमकं याच्या उलट झालं. सोशल मीडियावर लिडियाच्या प्रामाणिकपणाचे खूप कौतुक झालं. तसेच सोशल मीडियावर असा एक युक्तिवाद केला जात आहे, की बहुतेकसे दिग्गज क्रीडा पत्रकार (Veteran Sports Reporters) या विषयापासून कसे अनभिज्ञ आहेत किंवा कोणत्याही क्रीडा क्षेत्रातल्या महिला खेळाडूंना येणाऱ्या अतिरिक्त आव्हानांबद्दल त्यांना जाण नसते. क्रीडा जगतात मासिक पाळीची चर्चा हा एक महत्त्वाचा विषय बनवण्यासाठी भक्कम पाठिंबा मिळायला हवा.
First published:

Tags: Periods, Sports

पुढील बातम्या