रोहितसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद! दुहेरी शतकांच्या बादशाहला झालयं तरी काय?

दक्षिण आफ्रिकेविरोधात सुरू असलेल्या सराव सामन्यात सलामीला आलेला रोहित शुन्यावर बाद झाला.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 12:18 PM IST

रोहितसाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे बंद! दुहेरी शतकांच्या बादशाहला झालयं तरी काय?

विजयनगरम, 28 सप्टेंबर : भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच सज्ज आहे. मात्र दक्षिण आफ्रिका विरोधात होत असलेल्या सराव सामन्यात रोहितनं निराशाजनक कामगिरी केली आहे. या सामन्यात रोहितला आपलं खातंही उघडता आले नाही. वर्नोन फिलॅंडरच्या गोलंदाजीवर रोहित खातं न उघडता बाद झाला. त्यामुळं 2 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत सलामीला कोणता फलंदाज फलंदाजी करणार हे पाहावे लागणार आहे.

बोर्ड प्रसिडेंट इलेव्हन आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन दिवसीय सामना खेळला जात आहे. याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकीनं 279-6 धावांवर घोषित करण्यात आला. पहिला दिवस पावसामुळं रद्द झाला. तर दुसऱ्या दिवशी आफ्रिकीनं टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . पहिल्या दिवशी आफ्रिकीनं 199-4 धावा केल्या. यावेळी फॉर्ममध्ये असलेल्या आफ्रिकेच्या अडेन मार्करमनं शानदार शतकी खेळी केली. मात्र भारताच्या डावात रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. यामुळं भारताच्या सलामीचे प्रश्न उभा राहिला आहे.

वाचा-भारताच्या स्टार खेळाडूनं सोडला होता देश, पण इंग्लंडमध्येही झाला फ्लॉप!

केएल राहुलच्या जागी रोहितला मिळाली संधी

वेस्ट इंडिज दौऱ्यात रोहितला अकरा खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्याजागी केएल राहुल सलामीला फलंदाजीला उतरला होता. मात्र राहुलला एकाही सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं दक्षिण आफ्रिका विरोधात केएल राहुलला संघात जागा देण्यात आली नाही. त्यामुळं रोहित शर्माला सलामीला फलंदाजीसाठी संधी मिळू शकते. मात्र सराव सामन्यात शुन्यावर बाद झाल्यानंतर आता विराट सलामीला कोणाला उतरवणार हे पाहावे लागणार आहे. वेस्ट इंडिज विरोधात केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी सलामीला फलंदाजी केली होती.

Loading...

वाचा-रोहितचा विराट अवतार! भरमैदानात गोलंदाजाला घातल्या शिव्या, VIDEO VIRAL

टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटचा बादशाह कसोटीत मात्र फेल

वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळं रोहितचे एकदिवसीय आणि टी-20 मधले रेकॉर्ड पाहता, कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अशी कामगिरी करता आलेली नाही. एकीकडे रोहितनं 218 एकदिवसीय सामन्यात 8 हजार 686 धावा केल्या आहेत. तर, दुसरीकडे रोहितनं केवळ 27 कसोटी सामने खेळले आहेत. यात 1 हजार 585 धावा केल्या आहेत. 177ही कसोटी क्रिकेटमधली रोहितची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

रवी शास्त्री यांनी दिले रोहितला संधी देण्याचे संकेत

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये संधी देण्याचे संकेत दिले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितला स्वत:ला सिध्द करण्याची संधी मिळालेली नाही आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या दोन सामन्यात शतक लगावल्यानंतर रोहितला चांगली खेळी करता आलेली नाही. त्यामुळं दक्षिण आफ्रिका विरोधात रोहिला संधी दिली जाऊ शकते, असे संकेत रवी शास्त्री यांनी दिले होते.

वाचा-विराटची चिंता वाढली, भारताचं कसोटीतील सिंहासन धोक्यात!

VIDEO: युतीसंदर्भात शिवसेना काय निर्णय घेणार? यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 12:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...