Home /News /sport /

BCCI ने IPLमधील नव्या संघाच्या बोलीसाठी पुन्हा वाढवली मुदत

BCCI ने IPLमधील नव्या संघाच्या बोलीसाठी पुन्हा वाढवली मुदत

BCCI ने IPLमधील नव्या संघाच्या बोली साठी पुन्हा वाढवली मुदत

BCCI ने IPLमधील नव्या संघाच्या बोली साठी पुन्हा वाढवली मुदत

बीसीसीआयने(BCCI) आयपीएलच्या 2022 हंगामाची तयारी सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वीच बीसीसीआयने जाहीर केले होते की पुढीलवर्षी आयपीएलमध्ये 2 नवे संघ सामील होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. आता बीसीसीआयने या 2 नव्या संघांच्या निविदेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: आयपीएल(IPL2021) मधील 14 वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. दरम्यान बीसीसीआयने(BCCI) आयपीएलच्या 2022 हंगामाची तयारी सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वीच बीसीसीआयने जाहीर केले होते की पुढीलवर्षी आयपीएलमध्ये 2 नवे संघ सामील होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी 8 ऐवजी 10 संघ खेळताना दिसतील. आता बीसीसीआयने या 2 नव्या संघांच्या निविदेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. बीसीसीआयने बुधवारी (13 ऑक्टोबर) ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्याची तारिख वाढल्याचे सांगितले आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने 31 ऑगस्ट 2021 रोजी नॉन-रिफंडेबल निविदा शुल्क भरल्यावर उपलब्ध होणाऱ्या ‘निविदा आमंत्रण’ (ITT) दस्तऐवज जारी केले होते. त्यानंतर बीसीसीआयने ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्याची मुदत 5 ऑक्टोबर 2021 ऐवजी 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवली होती. हे वाचा- विराटनंतर 'या' इंग्लंडच्या क्रिकेटपटूला RCB चा कॅप्टन करा, मायकल वॉनची सूचना पण, आता निविदा आमंत्रण खरेदी करण्याच्या विविध इच्छुक उमेदवारांच्या विनंतीनुसार बीसीसीआयने पुन्हा एकदा ‘निविदा आमंत्रण’ खरेदी करण्याची मुदत 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, “बोली प्रक्रिया ठरल्याप्रमाणे पार पडली तर बीसीसीआयला किमान 5000 कोटी रुपयांचा नफा होऊ शकतो. कारण अनेक कंपन्या बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास उत्सुक आहेत. मात्र, 3000 कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांनाच बोली प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल. हे वाचा- T20World Cupआधी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच आयपीएलच्या दोन नवीन संघांसाठी लखनौ आणि अहमदाबादची नावे बराच काळ चर्चेत होती. पण आता या दोघांव्यतिरिक्त, गुवाहाटी, रांची, कटक आणि धर्मशाला यांचाही दावेदारांच्या यादीत समावेश आहे. या सहापैकी केवळ दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सामील होऊ शकतात, अशी माहिती आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: BCCI, Csk, Ipl

    पुढील बातम्या