मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटचा ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांमध्ये 18 आंतरराष्ट्रीय सामने

क्रिकेटचा ब्लॉकबस्टर महिना, 24 दिवसांमध्ये 18 आंतरराष्ट्रीय सामने

आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात (IPL 2021) 9 एप्रिलपासून झाली होती, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी स्पर्धा स्थगित करण्यात आली. आयपीएल स्थगित झाल्यामुळे चाहत्यांना संपूर्ण मे महिन्यात क्रिकेटचा आनंद घेता आला नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 2 जून : आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात (IPL 2021) 9 एप्रिलपासून झाली होती, पण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी स्पर्धा स्थगित करण्यात आली. आयपीएल स्थगित झाल्यामुळे चाहत्यांना संपूर्ण मे महिन्यात क्रिकेटचा आनंद घेता आला नाही, पण जून महिना मात्र क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉकबस्टर ठरणार आहे. 2 जूनपासून क्रिकेटच्या ब्लॉकबस्टर महिन्याची सुरुवात होत आहे. जूनच्या 24 दिवसांमध्ये क्रिकेट रसिकांना 18 आंतरराष्ट्रीय सामने बघता येणार आहेत. यामध्ये भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) समावेश आहे. याशिवाय इंग्लंड आणि भारताची महिला टीम पिंक बॉल टेस्टही खेळणार आहे, तसंच दोन्ही टीममध्ये वनडे आणि टी-20 सीरिजही होईल. जून महिन्याचं वेळापत्रक इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड- पहिली टेस्ट मॅच- 2 जून ते 6 जून नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड- पहिली वनडे मॅच- 2 जून नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड - दुसरी वनडे मॅच- 4 जून नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड- तिसरा वनडे मॅच- 7 जून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड- दुसरी टेस्ट मॅच- 11 जून ते 14 जून वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका- पहिली टेस्ट मॅच-11 जून ते 14 जून इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला- एकमेव टेस्ट मॅच- 15 जून ते 19 जून वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - दुसरी टेस्ट मॅच - 18 जून ते 22 जून वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप फायनल- भारत विरुद्ध न्यूझीलंड- 18 जून ते 22 जून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - पहिली टी20 - 23 जून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका- दुसरी टी20 - 24 जून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका- तिसरी टी20- 26 जून वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका- पहिली टी20- 26 जून वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका- दुसरा टी20 - 27 जून इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला - पहिली वनडे- 27 जून वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - तिसरी टी20- 29 जून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका- पहिली वनडे- 29 जून इंग्लंड महिला विरुद्ध भारत महिला - दुसरी वनडे - 30 जून
First published:

Tags: Cricket news, Team india

पुढील बातम्या