आता BCCI च्या निवडणुकीतही भाजपचं 'कमळ'

आता BCCI च्या निवडणुकीतही भाजपचं 'कमळ'

बीसीसीआयच्या अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांची निवड 23 ऑक्टोंबरला होणार आहे. यात भाजपाध्यक्ष अमित शहांचा मुलगा जय शहादेखील बीसीसीआय़च्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)च्या अध्यक्षपदासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने अर्ज दाखल केला. त्याची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी गांगुली आणि पटेल यांच्या नावाची चर्चा होती. अध्यक्ष कोणाला करावे यासाठी सुरुवातीला मतभेद होते. यात अनुराग ठाकूर आणि एन.श्रीनिवासन असे दोन गट पडले होते. पण नंतर या दोन्ही गटांचे गांगुलीच्या नावावर एकमत झाले. यासंदर्भात मुंबईत रविवारी रात्री एन.श्रीनिवासन, अनुराग ठाकूर आणि राजीव शुक्ला यांची सर्व राज्यातील प्रतिनिधींशी बैठक झाली. सध्या सीके खन्ना हे बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत.

अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आज (सोमवारी) नामांकन दाखल केले जाणार आहे. पण यासाठी कोणतीही निवडणूक होणार नाही. आयपीएलचे चेअरमन आणि उपाध्यक्षपदासाठी देखील शोध सुरु आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव होण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते आणि वित्त राज्यमंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमल कोषाध्यक्ष होऊ शकतो. अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआय़चे अध्यक्षपद भुषवलं आहे.

भाजपाध्यक्ष अमित शहांचे पुत्र जय शहा हे गुजरात क्रिकेट संघाचे माजी संयुक्त सचिव होते. तर अरुण धुमल सध्या हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी आहेत. तर आसामचे देबाजीत सैकिया हे संयुक्त सचिव होण्याची शक्यता आहे. सैकिया यांची निवड झाली तर बीसीसीआयमध्ये ईशान्येकडील व्यक्तीला प्रथमच इतके मोठे पद मिळेल.

23 ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक होणार असून सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी दिल्ली आणि मुंबईत राज्य क्रिकेट संघांची बैठक झाली. यामध्ये गांगुलीच्या नावावर सर्वांनी सहमती दर्शवली आहे. याशिवाय बृजेश पटेल यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते.

भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेला 47 वर्षीय गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशन(CAB)चा अध्यक्ष आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीचं नाव जवळपास निश्चित झालं असलं तरी तो फक्त 10 महिनेच या पदावर राहू शकतो. त्यामुळे तो सप्टेंबर 2020पर्यंत या पदावर राहू शकेल. नुकतीच सौरव गांगुलीची सीएबीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे गांगुलीला बीसीसीआयच्या नव्या संविधानानुसार कूलिंग ऑफ पीरियडमध्ये जावं लागेल. त्याला पुढच्या तीन वर्षांपर्यंत बीसीसीआयचं कोणंतही पद भूषवता येणार नाही.

VIDEO : पैशांचा एवढा पाऊस झाला की नोटा मोजण्यासाठी आणावं लागलं मशीन

Published by: Suraj Yadav
First published: October 14, 2019, 2:36 PM IST
Tags: BCCIBJP

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading