मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मोठी बातमी! गुजरात निवडणुकीत रविंद्र जडेजाच्या पत्नीला भाजपकडून तिकीट

मोठी बातमी! गुजरात निवडणुकीत रविंद्र जडेजाच्या पत्नीला भाजपकडून तिकीट

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी मोठी घडामोड पाहायला मिळत आहे.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी मोठी घडामोड पाहायला मिळत आहे.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी मोठी घडामोड पाहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • New Delhi, India

गुजरात, 03 नोव्हेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीचे अखेर बिगुल वाजले आहे. यंदा गुजरातमध्ये दोन टप्प्यांमध्य मतदान होणार आहे. पहिला टप्पा 1 आणि दुसरा टप्पा 5 डिसेंबर असणार आहे. तर मतमोजणीही 8 डिसेंबरला होणार आहे. यातच आता भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 84 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. भाजप नेते भूपेंद्र यादव आणि गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ही जाहीर केली आहे.

यावेळच्या निवडणूकीत मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. याठिकाणी यावेळी भाजपकडून भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांना जामनगर उत्तर या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेच्या एकूण 182 जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी दोन टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे.

भारतीय जनता पक्षाने गुरुवारी आगामी गुजरात निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोडिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मोरबीचे माजी आमदार कांतीलाल अमृत्या ज्यांनी पूल कोसळल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली होती, त्यांनाही भाजपने उमेदवारी जाहीर केलीये.

हेही वाचा - कोण आहेत पत्रकार इसुदान गढवी? ज्यांना AAP ने गुजरात निवडणुकीत बनवलंय CM पदाचा चेहरा

संभाव्य उमेदवारांमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांच्यासोबत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी झालेल्या बैठकीनंतर ही यादी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर प्रमुख नेते पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीला उपस्थित होते.

पाच वर्षांपूर्वी अत्यंत चुरशीच्या झालेल्या गुजरात निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या आणि प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. तर हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांना पक्षाचे तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले होते. अहमदाबादमधील विरमगाममधून पटेल यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि भूपेंद्रसिंह चुडासामा, प्रदिपसिंह जडेजा या इतर दोन ज्येष्ठ नेत्यांनी ते आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, असे जाहीर केले आहे.

First published:

Tags: BJP, Gujrat, Ravindra jadeja