Home /News /sport /

Birthday Special : क्रिकेटचा बेताज बादशाह वीरू! रेकॉर्डच सांगतात पुरावे

Birthday Special : क्रिकेटचा बेताज बादशाह वीरू! रेकॉर्डच सांगतात पुरावे

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याचा आज वाढदिवस आहे. नजफगडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा सेहवाग आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)  याचा आज वाढदिवस आहे. नजफगडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा सेहवाग आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 20 ऑक्टोबर 1978 ला सेहवागचा जन्म दिल्लीतील एका जाट कुटुंबामध्ये झाला. सेहवागने आपल्या कारकिर्दीत 104 टेस्ट, 251 वनडे आणि टी -20 चे 19सामने खेळले. यामध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये 8,586 रन, वनडेमध्ये 8,273 रन तर टी -20 सामन्यांमध्ये 394 रन केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीत त्याने एकूण 38 शतके ठोकली असून काही सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. वनडेमधलं पदार्पण खराब 1999 साली पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. परंतु या सामन्यात त्याला खास कामगिरी करण्यात यश आलं नाही. या सामन्यात त्याने केवळ एक रन केली होती. त्याच बरोबर बॉलिंगमध्ये 3 ओव्हरमध्ये 35 धावा दिल्याने त्याला पुढच्या सामन्यातखेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याला पुढील सामना खेळण्यासाठी 1 वर्ष वाट पाहावी लागली होती. त्याने करिअरमधल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 धावांची खेळी करत 3 विकेट देखील घेतल्या होत्या. टेस्टमध्ये धमाकेदार पदार्पण टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी सेहवागला 2 वर्षांची वाट पाहावी लागली. 2001 मध्ये त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करताना सहाव्या क्रमांकावर बॅटिंग केली होती. या सामन्यात सेहवागने सचिन तेंडुलकरसोबत 220 रनची महत्त्वाची भागीदारी केली. पण या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. पहिल्या दोन सामन्यांत त्याने 84 आणि 106 रनची धमाकेदार खेळी करत टीममध्ये आपली जागा पक्की केली होती. दोन वर्ल्ड कप विजयात योगदान आपल्या कारकिर्दीमध्ये सेहवागने भारताला दोन वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. सेहवागने 3 वनडे वर्ल्ड कप आणि 1 टी -20 वर्ल्ड कप खेळला. यामध्ये 2003 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाली होती, तर 2007 वर्ल्ड कपमध्ये भारताला पहिल्या फेरीतच मायदेशी परतावं लादलं होतं. 2011 साली भारताने फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. या वर्ल्ड कपमध्ये सेहवागने 47.50 च्या सरासरीने 380 रन केले होते. सचिननंतर वनडेमध्ये 1 हजार फोर मारणारा दुसरा भारतीय स्फोटक बॅट्समन असणारा सेहवाग सचिन तेंडुलकर नंतर वनडे मॅचमध्ये 1 हजार फोर मारणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याचबरोबर तो क्रिकेटर झाला नसता तर फार्मासिस्ट असता असं म्हटलं होतं. 31 वेळा मॅन ऑफ द मॅच 2008 आणि 2009 मध्ये विजडन लीडिंग क्रिकेटर सन्मान मिळवणाऱ्या सेहवागने आपल्या कारकिर्दीत 31 वेळा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जिंकला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीमध्ये बॅटिंग करणाऱ्या सेहवागला 2002 मध्ये माजी कर्णधार सौरव गांगुलीने सलामीला खेळण्याची संधी दिली. मेलबर्नमध्ये 195 रनची शानदार खेळी 2003 मध्ये सेहवागने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर जबरदस्त 195 रनची खेळी केली. या सामन्यात देखील त्याने सिक्स मारून आपले द्विशतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सेहवागने त्यानंतर मी सिक्स मारण्यापासून केवळ 6 यार्ड दूर होतो असं म्हटलं. होतं. आपल्या टेस्ट कारकिर्दीमध्ये तो पाच वेळा नर्व्हस नाईंटीमध्ये आऊट झाला होता. सेहवाग त्याच्या कारकिर्दीत 90, 90, 92, 96 आणि 99 रनवर माघारी परतला होता. त्रिशतकांबाबत या दिगजांशी बरोबरी सेहवागने आपल्या टेस्ट कारकिर्दीत एकूण 2 त्रिशतकं झळकावली. डॉन ब्रॅडमन, ब्रायन लारा आणि क्रिस गेलनंतर टेस्टमध्ये 2 त्रिशतकं झळकवणारा तो जगातील केवळ चौथा खेळाडू आहे. त्याचबरोबर सर्वात जलद त्रिशतक झळकावण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 270 चेंडूंत त्रिशतक झळकावलं होतं. वनडेमध्ये वेगवान शतक वनडे क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. 2011 मध्ये विराट कोहलीने त्याचा विक्रम मोडला. 62 बॉलमध्ये शतक करत त्याने हा विक्रम केला होता. त्याने आपल्या कारकिर्दीत 5 वेळा 150 हुन अधिक रन केल्या आहेत. सेहवागच्या नावावर आहेत हे रेकॉर्ड सेहवागने आपल्या 23 कसोटी शतकांमध्ये ७ शतकं ही 100 पेक्षा कमी बॉल खेळून बनवली आहेत. त्याचबरोबर 3 द्विशतके 200 पेक्षा कमी बॉलमध्ये केली आहेत. त्याचबरोबर टेस्टमध्ये त्रिशतक झळकावण्या बरोबरच 5 विकेट घेण्याचा कारनामादेखील केला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो एकमेव खेळाडू आहे. तसंच त्याने आपल्या 6 द्विशतकांतील 5 द्विशतकं ही 230 पेक्षा कमी बॉलमध्ये केली आहेत. सचिनबरोबर सर्वांत यशस्वी सलामी जोडी सचिन तेंडुलकर आणि सेहवागने 93 सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून डाव सुरू केला आहे. यामध्ये त्यांनी 42.13 च्या सरासरीने 3919 रन केल्या. यामध्ये 12 वेळा शतकी सलामी देखील या दोघांनी दिली. सचिन आणि गांगुलीनंतर भारताची सर्वांत यशस्वी सलामी जोडी सचिन आणि सेहवागची आहे. तेंडूलकर आणि गांगुलीने 136 डावांमध्ये 21 शतकी भागीदारी करत 6,609 रन केल्या होत्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या