S M L

बर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास!

सचिन हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:26 PM IST

बर्थडे स्पेशल : सचिनचा प्रेरणादायी प्रवास!

24 एप्रिल : आज आपल्या सगळ्यांचा लाडका, क्रिकेट प्रेमींच्या हृदयाची धडकन मास्टर ब्लास्टर 'सचिन रमेश तेंडूलकर'चा वाढदिवस आहे. सचिन हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याच्या जबरदस्त फलंदाजीमुळे त्यांनी अनेक इतिहास रचले आहेत. पण आपल्या जिद्दीशिवाय आणि अथक प्रयत्नांशिवाय यशाचं शिखरं गाठता येत नाही हे सचिनच्या सुरुवातीच्या काळात दिसून आलं

आपल्या फलंदाजीने सगळ्यांच्या मनात घर करण्यारा सचिन मुंबईच्या एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मला. सचिनच्या कुटुंबीयांचे सगळ्या आवडते गायक सचिन देव बर्मन यांच्या नावावरून त्याचं सचिन असे नाव ठेवण्यात आलं आहे.

सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर या शाळेत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली.

१९८८/१९८९ साली तो आपल्या पहिल्यावहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामध्ये १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो मुंबई संघामधून गुजरात संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा तो सर्वांत तरुण खेळाडू होता.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध कराची येथे खेळला. त्या सामन्यात त्याने वासिम अक्रम, इम्रान खान, अब्दुल कादीर आणि वकार युनूससारख्या दिग्गज गोलंदाजांचा सामना केला. पण यात वकार युनूसने त्याला ५ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यामुळे सचिनची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील सुरुवात तशी खराबच झाली असं म्हणायला हरकत नाही. पण नंतर त्याने त्याच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर अनेक सामन्यांना आपल्या नावे करुन घेतलं.

Loading...
Loading...

सचिन नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ३७ बळी आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते.

अनेक कसोट्या, एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिनने त्याची ताकद दाखवली आहे. अनेक वेळा सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे.

सचिनला चाहत्यांचं अनोख गिफ्ट

सचिनच्या अफलातून खेळीमुळे त्याचे जगभरात चाहते आहेत. आजच्या दिवशी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्याने एक त्याला अनोखी भेटवस्तू दिलीये.

सचिनच्या प्रेमापोटी सचिन जाधव या चाहत्याने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने चक्क 'तेंडल्या' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे तर नुकतंच या सिनेमाचं पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आम्ही आमच्या आयुष्यातील सचिनचे स्थान अधोरेखित करत आहोत. सचिनच्या चाहत्यांविषयी 'तेंडल्या' या चित्रपटामध्ये भाष्य करण्यात आलं असल्याचं दिग्दर्शक सचिन जाधव यांनी सांगितलं आहे. आता 'तेंडल्या' हा सिनेमा नक्की कसा असणार यामध्ये चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 08:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close