मुंबई, 26 एप्रिल : भारत आणि पाकिस्तानची (India vs Pakistan) टीम पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात एकमेकांना भिडणार आहेत. आयसीसीने बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या क्वालिफायिंग टीमची घोषणा केली आहे. या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला टी-20 मॅच खेळवल्या जाणार आहेत. आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचं स्थान पक्कं झालं आहे, त्यामुळे कॉमनवेल्थ गेम्समध्ये चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामना बघायला मिळू शकतो.
बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्सना पुढच्यावर्षी 28 जुलै ते 8 ऑगस्टमध्ये खेळवले जातील. इतिहासात दुसऱ्यांदाच क्रिकेट कॉमनवेल्थ गेम्सचा भाग असेल, याआधी 1998 साली क्वालालंपूर ऑलिम्पिक्समध्ये पुरुष क्रिकेट टीम यामध्ये खेळली होती, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला होता. पहिल्यांदाच महिला क्रिकेट टीमचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
Cricket is the first discipline to announce qualifying teams for the Birmingham 2022 Commonwealth Games 🏏#B2022 | Details 👇
— ICC (@ICC) April 26, 2021
Teams that have qualified for the Birmingham 2022 Commonwealth Games 🎉#B2022 pic.twitter.com/sYJqUJPHxl
— ICC (@ICC) April 26, 2021
आयोजक देश असल्यामुळे इंग्लंडचा या स्पर्धेत थेट प्रवेश झाला. 1 एप्रिल 2021 ला महिला टी-20 क्रमवारीतल्या टॉप-6 टीम स्पर्धेसाठी क्वालिफाय झाल्या. याशिवाय आणखी एक टीम कॉमनवेल्थ गेम्स क्वालिफायरमधून येईल. बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचे सगळे सामने एजबेस्टनमध्ये खेळवले जातील.
बुधवारी आयसीसी आणि राष्ट्रमंडळ खेळ महासंघाने क्वालिफिकेशन प्रक्रियेची माहिती दिली. या स्पर्धेत 72 देशांचं 45 हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील.
भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) कॉमनवेल्थ गेम्समध्येही आमची कामगिरी टी-20 वर्ल्ड कपसारखीच होईल, असा विश्वास वर्तवला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्वालिफाय झाल्यामुळे चांगलं वाटत आहे. महिलांसाठी आणि क्रिकेटसाठी ही चांगली गोष्ट आहे. चांगल्या आठवणी घेऊन आम्ही परत यायचा प्रयत्न करू, असं हरमनप्रीत आयसीसीशी बोलताना म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket