टीम इंडियाला मोठा धक्का, IPL 2020पर्यंत 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही क्रिकेट?

टीम इंडियाला मोठा धक्का, IPL 2020पर्यंत 'हा' स्टार खेळाडू खेळणार नाही क्रिकेट?

टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू पुढच्या वर्षीपर्यंत खेळणार नाही क्रिकेट.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: भारतानं वर्ल्ड कपनंतर दक्षिण आफ्रिक आणि वेस्ट इंडिज विरोधात चांगली कामगिरी केली आहे. मात्र भारताचे लक्ष्य पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप आणि टेस्ट चॅम्पियनशीप असणार आहे. मात्र या सगळ्यात भारताचे दोन महत्त्वाचे फलंदाज दुखापतीमुळं क्रिकेट खेळू शकत नाही आहेत. याआधी जसप्रीत बुमराहच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळं त्यानं क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती. दरम्यान आता आणखी एक गोलंदाज दुखापतीमुळं क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. हा स्टार खेळाडू आहे, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या.

हार्दिक पांड्या बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेत खेळण्याची शक्यता कमी आहे. पांड्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळं त्यानं माघार घेतली आहे. दरम्यान बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीत पांड्या IPL 2020पर्यंत क्रिकेट खेळू शकणार नसल्याची चिंता व्यक्त केली आहे. दुखापतीमुळं पांड्याला पाच ते सहा महिने क्रिकेटपासून लांब रहावे लागणर आहे. हार्दिक उपचारासाठी इंग्लंडला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दुबईमध्ये झालेल्या आशियाई कप दरम्यान पांड्याला दुखापत झाली होती.

दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटी मालिका होण्याआधी संघाबाहेर पडणारा पांड्या दुसरा खेळाडू आहे. याआधी बुमराहनं माघार घेतली होती. त्यामुळं ऐन महत्त्वाच्या मालिकांआधी विराटला डबल दणका बसला आहे. बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "दुखापतींमुळे हार्दिक पांड्याला दक्षिण आफ्रिका विरोधात विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळं पांड्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोदा संघाकडून खेळत नाही आहे. त्यामुळं आयपीएल 2020पर्यंत फिट होईल अशी अपेक्षा आहे", असे सांगितले.

25 वर्षांच्या पांड्यानं 11 कसोटी सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. यात 532 धावा केल्या आहेत. तर 54 एकदिवसीय सामन्यात 937 धावा केल्या आहेत तर 54 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 सामन्यात 310 धावा आणि 38 विकेट घेतल्या आहेत.

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Published by: Akshay Shitole
First published: October 1, 2019, 8:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading