लुसेल-कतार, 26 नोव्हेंबर: गेल्या रविवारपासून आखाती देश कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप सुरु आहे. सध्या फुटबॉलच्या या महासंग्रामात साखळी सामने सुरु आहेत. सुरु होण्याआधी ते आतापर्यंत ही स्पर्धा अनेक वादांमुळे चर्चेत राहिली आहे. त्यातच आज होणाऱ्या अर्जेन्टिना आणि मेक्सिको सामन्याआधी एक मोठी घटना घडली आहे. मेक्सिको आणि अर्जेन्टिना संघात आज साखळी फेरीतला सामना खेळवण्यात येणार आहे. त्याआधी स्टेडियमच्या बाहेर चाहत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फॅन झोनच्या शेजारी एका इमारतीला मोठी आग लागली. त्यामुळे एकच गोंधळ माजला.
लुसेल स्टेडियमबाहेर आग
सोशल मीडियात या आगीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. त्यामुळे अर्जेन्टिना-मेक्सिको सामना होणार की नाही अशा चर्चाही रंगू लागल्या.
Fire near FIFA 'fan zone' in Qatar 👀 #FIFAWorldCup #WorldcupQatar2022 pic.twitter.com/PysQuwQNj8
— CtrlAltDelete (@TakingoutTrash7) November 26, 2022
मिळालेल्या माहितीनुसार फॅन झोनशेजारी एका इमारतीचं काम सुरु होतं. त्या इमारतीला ही आग लागली. ही आग इतकी भयानक होती की आगीमुळे उठलेला काळा धूर अनेक किमी लांबून दिसत होता. याचे व्हिडीओ सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा - Ind vs NZ ODI: पहिल्या वन डेत धावांचा पाऊस... पण हॅमिल्टनमध्ये खरा पाऊस? पाहा Weather Report
आग आटोक्यात, मॅच वेळेनुसार
संबंधित घटना स्टेडियमपासून जवळपास 3.5 किमी अंतरावर घडली आहे. दरम्यान ही आग आटोक्यात आली असून सामन्यावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती आहे. अर्जेन्टिना आणि मेक्सिको संघातला हा सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री 12.30 वा. होणार आहे. पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाविरुद्ध अर्जेन्टिनाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आजची लढत अर्जेन्टिनासाठी निर्णायक ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA, FIFA World Cup, Football, Sports