मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 आधी RCB च्या टीममध्ये मोठे बदल, कोचचा राजीनामा, टीम इंडियाला त्रास देणाऱ्याला संधी

IPL 2021 आधी RCB च्या टीममध्ये मोठे बदल, कोचचा राजीनामा, टीम इंडियाला त्रास देणाऱ्याला संधी

आयपीएलआधी आरसीबीच्या टीममध्ये मोठे बदल

आयपीएलआधी आरसीबीच्या टीममध्ये मोठे बदल

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू व्हायच्या आधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टीमचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच (Simon Katich) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 21 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू व्हायच्या आधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. टीमचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच (Simon Katich) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्याच्याऐवजी माईक हेसन यांची प्रशिक्षपदी निवड झाली आहे. टीम इंडियाला त्रास देणारा श्रीलंकेचा ऑलराऊंडर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga), फास्ट बॉलर दुष्मंता चमिरा (Dushmantha Chameera), सिंगापूरचा टीम डेव्हिड (Tim David) यांना आरसीबीने युएईमध्ये होणाऱ्या आयपीएलसाठी संधी दिली आहे. न्यूझीलंडचे फिन एलन (Finn Allen), स्कॉट कुगलेईन (Scott Kuggeleijn) बांगलादेश दौऱ्यामुळे आयपीएलसाठी उपलब्ध नसतील. तर एडम झम्पा (Adam Zampa), डॅनियल सॅम्स (Daniel Sams) आणि केन रिचर्डसन (Kane Richardson) यांनी आपण उपलब्ध नसल्याचं सांगितलं. श्रीलंकेचा लेग स्पिनर आणि ऑलराऊंडर वानिंदु हसरंगाने भारताविरुद्धच्या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी केली. टी-20 सीरिजमध्ये हसरंगाला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं होतं. तर याच सीरिजमध्ये दुष्मंता चमीराने 5.25 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग करत 4 विकेट घेतल्या होत्या. सिंगापूरमध्ये जन्मलेल्या टीम डेव्हिड याने पीएसएलमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. याआधी बिग बॅश लीगमध्ये त्याने 153.29 च्या स्ट्राईक रेटने 279 रन केले. तर काऊंटी क्रिकेटमध्ये सरेकडून खेळताना लिस्ट ए सामन्यात डेव्हिडने 4 सामन्यात दोन शतकं आणि एक अर्धशतक केलं. याशिवाय आरसीबीकडे आणखी एक परदेशी खेळाडूची जागा खाली आहे. ही जागा येत्या काही दिवसात भरली जाणार आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या या मोसमाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे, तर 15 ऑक्टोबरला फायनल खेळवली जाईल. कोरोना व्हायरसमुळे 29 मॅचनंतर आयपीएल मे महिन्यात स्थगित करण्यात आली होती. आता उरलेले 31 सामने युएईमध्ये खेळवले जातील. आयपीएलच्या या मोसमात आरसीबीने 7 पैकी 5 मॅच जिंकल्या तर 2 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबीची टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे.
First published:

Tags: IPL 2021, RCB, Virat kohli

पुढील बातम्या