चेन्नई, 23 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रंगणाऱ्या सामन्याआधी हैदराबादच्या संघाला धक्का बसला आहे. हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन दुखापतीतून सावरत असताना, आता त्याला अचानक माघारी परतावं लागलं आहे. त्यामुळं आता पुन्हा विल्यमसन ऐवजी भुवनेश्वर कुमारला संघाच नेतृत्व करावे लागणार आहे.
#IPL2019 Sunrisers Hyderabad captain Kane Williamson will miss out on today's IPL match against Chennai Super Kings,owing to personal reasons.Williamson has returned to NewZealand,it has been learnt.@IPL @SunRisers @NotNossy @BhuviOfficial @NBT_Sports @NBTLucknow @SandhyaTimes4u
— SANJEEV KUMAR (@sanjeevmediaNBT) April 23, 2019
विल्यमसनच्या आजीचं निधन झाल्यामुळं त्याला मायदेशी परतावं लागलं आहे. याकरिता तो न्युझीलंडला परतला आहे. केन पुन्हा संघात कधी सामिल होणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, राजस्थान रॉयल्स विरोधात 27 एप्रिलच्या सामन्याआधी तो पुन्हा संघात सामिल होऊ शकतो. सनरायजर्स हैदरबादचा संघा आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. 9 सामन्यात 5 सामने जिंकत त्यांनी 10 गुण जमवले आहे.
दरम्यान, याआधीही विल्यमसनच्या अनुपस्थितीत बाराव्या हंगामात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भुवनेश्वरने हैदराबादच्या संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. याचसोबत हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो मायदेशी रवाना झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबादचा संघ कोणत्या खेळाडूला संधी देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हैदराबादनं मागच्या सामन्यात कोलकाताच्या संघाला एकतरफी हरवलं होतं. या सामन्यात सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नर यांनी विक्रमी भागीदारी केली होती. या दोन्ही फलंदाजांच्या तुफान फलंदाजीच्या जोरावर हैदराबादनं एकहाती जिंकला होता. हैदराबाद संघान सलग दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळं विजयाची हॅट्रीक करण्यासाठी सध्या हैदराबादचा संघ उत्सुक आहे. याआधी चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात हैदराबादनं चेन्नईला हरवलं होतं.
हैदराबाद संघाचा कर्णधार केन विल्यमसन या हंगामात विशेष चांगली कामगिरी करु शकलेला नाही. त्यानं चार सामन्यात केवळ 28 धावा केल्या आहेत. त्याचाय स्ट्राईकरेट केवळ 87.50 आहे. मागच्या हंगामात केन हा सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला होता.
दुसरीकडं चेन्नईच्या संघाला मागच्या दोन्ही सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळं तर आता धोनीच्या संघाला विजय मिळवणे महत्त्वाचे असणार आहे.
VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'