LIVE सामन्यात अम्पायरला ‘याडं लागलं’, पाहा हा भन्नाट VIDEO

LIVE सामन्यात अम्पायरला ‘याडं लागलं’, पाहा हा भन्नाट VIDEO

लाईव्ह सामन्यात स्टम्प लावत असताना पंच चक्क खाली पडता पडता वाचले, हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

सिडनी, 13 जानेवारी : ऑस्ट्रेलियातील बिग बॅश ही लीग ही क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत अनेक धक्कादायक प्रकार घडत असतात. कधी फलंदाजांच्या शॉटची तर कधी कॅचची चर्चा होत असते. मात्र सध्या चर्चा होत आहे ती एका अम्पायरची. लाईव्ह सामन्यात स्टम्प लावत असताना पंच चक्क खाली पडता पडता वाचले, हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रसंग घडला तो अ‍ॅडलेड स्टायकर्स विरूद्ध मेलबर्न यांच्यात झालेल्या सामन्यात. या सामन्यामध्ये एका पंच फार विचित्र पध्दतीनं मैदानात पडला. त्यामुळं सगळ्यांना हसु अनावर झाले. शॉन क्रेग हे पंच स्टंपवरील बेल्स लावण्यासाठी स्टंपजवळ आले. त्यांनी स्टंपवरील बेल्स नीट लावल्या आणि त्यानंतर ते झटपट आपल्या जागी जाण्यासाठी निघाले. मात्र या सगळ्या धावपळीत त्यांचा पाय स्टम्पजवळ सरकला आणि शॉन क्रेग तिथल्या तिथेच जागेवर खाली पडले. सुदैवाने त्यांना फारसे लागले नाही पण या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-दिल्ली कॅपिटल्सचे 4.80 कोटी वसूल, IPLआधीच खेळाडूनं 79 चेंडूत केल्या 147 धावा!

वाचा-टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला दिली संधी

View this post on Instagram

The pitch is lava #BBL09

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on

वाचा-VIDEO : स्टार क्रिकेटपटूच्या ‘बालिश’ शॉटने दर्शकांना केले हैराण

वाचा-धोनीनेसुद्धा असं कधी केलं नाही, यष्टीरक्षकाच्या VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

दरम्यान, या सामन्यात स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार ट्रेव्हिस हेड याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. जॉनाथन वेल्स (58) आणि मॅथ्यू शॉर्ट (41) यांच्या दमदार खेळीच्या बळावर त्यांनी 173 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना रेनेगेड्स संघाचा डाव 110 धावांवर आटोपला.

Published by: Priyanka Gawde
First published: January 13, 2020, 4:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading