Home /News /sport /

BBL ची थरारक सेमी फायनल, शेवटच्या ओव्हरला 12 रनची गरज, पहिल्या 2 बॉलला 2 विकेट, आणि मग...

BBL ची थरारक सेमी फायनल, शेवटच्या ओव्हरला 12 रनची गरज, पहिल्या 2 बॉलला 2 विकेट, आणि मग...

क्रिकेटच्या सामन्यात अखेरच्या बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं, असं म्हणतात. याचाच प्रत्यय बिग बॅश लीगच्या (Big Bash League) सेमी फायनलमध्ये आला. सिडनी सिक्सर्सनी अखेरच्या ओव्हरच्या रोमांचक सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सचा (Sydney Sixers vs Adelaide Strikers) 4 विकेटने पराभव केला आणि फायनलमध्ये स्थान पटकावलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जानेवारी : क्रिकेटच्या सामन्यात अखेरच्या बॉलपर्यंत काहीही होऊ शकतं, असं म्हणतात. याचाच प्रत्यय बिग बॅश लीगच्या (Big Bash League) सेमी फायनलमध्ये आला. सिडनी सिक्सर्सनी अखेरच्या ओव्हरच्या रोमांचक सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सचा (Sydney Sixers vs Adelaide Strikers) 4 विकेटने पराभव केला आणि फायनलमध्ये स्थान पटकावलं. सिडनी आता फायनलमध्ये पर्थ स्कॉचर्सविरुद्ध खेळेल. सिडनीला अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 12 रनची गरज होती. सुरुवातीच्या 2 बॉलला 2 विकेट गेल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या, पण हेडन केरने (Hayden Kerr) धमाकेदार बॅटिंग करत टीमला फक्त जिंकवलंच नाही, तर फायनलचं तिकीटही मिळवून दिलं. सिडनी सिक्सर्सनी 19 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 156 रन केले, यामुळे त्यांना शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रनची गरज होती. सीन एबॉट आणि हेडन केर मैदानात होते. पीटर सीडलने शेवटची ओव्हर हॅरी कॉनवेला दिली. कॉनवेने पहिल्याच बॉलला एबॉटला कॅच आऊट केलं. एबॉटने 20 बॉलमध्ये 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 41 रन केले. पुढच्याच बॉलवर बेन ड्वारशुईस रन आऊट झाला, पण धावल्यामुळे टीमला 1 रन मिळाली. आता सिडनीला विजयासाठी 4 बॉलमध्ये 11 रन हवे होते. तिसऱ्या बॉलवर जॉर्डन सिल्कने एक रन काढली आणि स्ट्राईक हेडनला दिला. चौथ्या बॉलवर हेडन केरने सिक्स मारली आणि पाचव्या बॉलला 2 रन काढून स्ट्राईक स्वत:कडेच ठेवला. ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर सिडनीला विजयासाठी 2 रन हवे होते, तेव्हा हेडनने फोर मारून सिडनी सिक्सर्सला फायनलमध्ये पोहोचवलं. हेडन केरचा 16 रनवर कॅच सोडण्यात आला होता, याचा फायदा त्याने उचलला. हेडनने 58 बॉलमध्ये नाबाद 98 रनची पार्टनरशीप केली. आपल्या इनिंगमध्ये त्याने 10 फोर आणि 2 सिक्स मारले. या थरारक बॅटिंगमुळे हेडनला प्लेयर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. बिग बॅश लीगची फायनल 28 जानेवारीला पर्थ स्कॉचर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात मेलबर्नमध्ये होईल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या