मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Big Bash League: ‘हा’ अशक्य कॅच पाहणारा प्रत्येक जण झाला थक्क, पाहा VIDEO

Big Bash League: ‘हा’ अशक्य कॅच पाहणारा प्रत्येक जण झाला थक्क, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग (Big Bash League) सुरु आहे. या स्पर्धेत रेनगेड्सच्या मॅक्नझी हार्वे (Mackenzie Harvey) नं एक जबरदस्त कॅच घेतला. हार्वेनं घेतलेला कॅच हा स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच मानला जात आहे.

कॅरारा(ऑस्ट्रेलिया), 2 जानेवारी : ऑस्ट्रेलियात सध्या बिग बॅश लीग (Big Bash League) सुरु आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मेलबर्न रेनग्रेड्स (Melbourne Renegades) वि. सिडनी थंडर (Sydney Thunder) या दोन टीममध्ये मॅच झाली. या मॅचमध्ये रेनगेड्सच्या मॅक्नझी हार्वे (Mackenzie Harvey) नं एक जबरदस्त कॅच घेतला. हार्वेनं घेतलेला कॅच हा स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच मानला जात आहे.

नेमकं काय घडलं?

सिडनी थंडरच्या टीमनं मागच्या आठवड्यातच स्पर्धेच्या इतिहासीत दुसऱ्या क्रमांकाचा विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. थंडरचा ओपनर आणि इंग्लंडचा बॅट्समन अ‍ॅलेक्स हेल्सनं (Alex Hales) थंडरला वेगवान सुरुवात करुन दिली. हेल्स पाहता-पाहता 18 बॉल्समध्ये 45 रन्सवर पोहचला होता. रेनगेड्सचा नवोदीत बॉलर मिचेल पेरीच्या पाच बॉल्समध्ये त्यानं 22 रन्स काढले होते. पेरीनं सहावा आणि ओव्हरचा शेवटचा बॉल फुलटॉस टाकला. तो देखील हेल्सनं जोरात खेळला. त्यावेळी थंडर्सच्या हार्वेनं कुणालाही काही कळण्याच्या आत झेपावत कॅच पकडला.

या मॅचची कॉमेंट्री करणाऱ्या मार्क होवार्ड यांनी या स्पर्धेतील सर्वोत्तम कॅच (Catch of the tournament) असं याचं वर्णन केलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसी देखील हा कॅच पाहून प्रभावित झाला आहे. ‘मी पाहिलेला एक सर्वोत्तम कॅच असं हसीनं या कॅचचं वर्णन केलं आहे. रेनगेड्सचा कॅप्टन आरोन फिंचनंही त्याच्या सहकाऱ्याची प्रशंसा केली आहे. ‘हार्वे हा एक उत्तम फिल्डर असून त्याने एक जबरदस्त कॅच पकडला आहे,’ असं फिंच म्हणाला. सोशल मीडियावर देखील हा कॅच आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

नो बॉलवर पकडला कॅच?

हार्वेचा कॅच सोशल मीडियावर व्हायरल होताच तो कॅच नो बॉलवर घेतल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे.

बिग बॅश स्पर्धेतील अंपायर्सची कामगिरी हा यावर्षी टीकेचा मुद्दा बनली आहे. अंपायरनं यंदा देखील नो बॉल कडं दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. अर्थात हा आरोप करणाऱ्या मंडळींनी देखील हार्वेनं घेतलेल्या कॅचची प्रशंसा केली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket