टी-20 क्रिकेटमध्ये झाले मोठे बदल, थेट 5 संघ पोहचणार फायनलमध्ये!

17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या हंगामाचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी 2020ला होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 06:03 PM IST

टी-20 क्रिकेटमध्ये झाले मोठे बदल, थेट 5 संघ पोहचणार फायनलमध्ये!

सिडनी, 25 जुलै : जगातली सर्वात मोठी टी-20 स्पर्धा मानल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आयपीएलप्रमाणे खेळण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या 9व्या हंगामाचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या हंगामाचा अंतिम सामना 8 फेब्रुवारी 2020ला होणार आहे. बिग बॅश लीगला सर्वात मोठी लीग स्पर्धा मानली जाते.

बिग बॅश लीगचे नववे हंगाम हे वेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळले जाणार आहे. यात अंतिम सामना तब्बल पाच संघांमध्ये होणार आहे. बिग बॅशमध्ये 8 संघ भिडणार आहेत. यात आता गुणतालिकेत पहिल्या पाच क्रमांकावर असलेले संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहेत.

हे आहेत नवीन नियम

पहिल्या पाच संघातील जे संघ चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर असतील त्यांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी सलग चार सामने जिंकावे लागणार आहेत. तर, पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांना फायनलमध्ये पोहचण्यासाठी दोन संधी असणार आहे. हे हंगाम 42 दिवस चालणार आहे.

IND vs WI : टीम इंडियात हार्दिक पांड्याची कमी पूर्ण करणार 'हे' तीन अष्टपैलू खेळाडू

Loading...

वाचा-निवृत्तीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार युवराज सिंग, येथे पाहू शकता सामना

असा आहे फायनलचा फॉरमॅट

एलिमिनेटर-30 जानेवारीला चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या संघांमध्ये सामना होईल.

क्वालिफायर- 31 जानेवारीला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये लढत होईल.

नॉकआऊट- 1 फेब्रुवारी तिसरी आणि एलिमिनेटर जिंकलेला संघ.

चॅलेंजर्स- 6 फेब्रुवारी क्वालिफायर हरलेला संघ आणि एलिमिनेटर हरलेला संघ यांच्यात सामना होणार.

फायनल- 8 फेब्रुवारी क्वालिफायर विजेता आणि चॅलेंजर्स विजेता संघ.

वाचा- कॅप्टन कोहलीमुळं रवी शास्त्री पॉवरफुल, प्रशिक्षक पदी राहणार कायम?

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...