मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

वडील दिग्गज फास्ट बॉलर, मुलाने T20 मध्ये घडवला इतिहास, 3 दिवसात ठोकलं दुसरं शतक!

वडील दिग्गज फास्ट बॉलर, मुलाने T20 मध्ये घडवला इतिहास, 3 दिवसात ठोकलं दुसरं शतक!

बेन मॅकडरमेटची (Ben Mcdermott) बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. बेनने बुधवारी होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध (Melbourne Renegades vs Hobart Hurricanes) शतक ठोकलं.

  • Published by:  Shreyas

मेलबर्न, 29 डिसेंबर : बेन मॅकडरमेटची (Ben Mcdermott) बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. बेनने बुधवारी होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना मेलबर्न रेनेगेड्सविरुद्ध (Melbourne Renegades vs Hobart Hurricanes) शतक ठोकलं. टी-20 लीगमधलं तीन दिवसांमधलं बेनचं हे दुसरं शतक आहे. बिग बॅश लीगच्या इतिहासात लागोपाठ दोन सामन्यांमध्ये दोन शतकं करणारा बेन पहिलाच खेळाडू बनला आहे. बेनच्या या शतकामुळे होबार्ट हरिकेन्सने 5 विकेट गमावून 206 रन केले.

बेन मॅकडरमेटने 27 डिसेंबरला ऍडलेड स्ट्रायकर्सविरुद्ध 60 बॉलमध्ये नाबाद 110 रन केले होते. यानंतर बुधवारी ओपनिंगला आलेला मॅकडरमेट अखेरच्या बॉलवर आऊट झाला. त्याने 65 बॉलमध्ये 127 रन केले, यात 9 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता. म्हणजेच त्याने 90 रन बाऊंड्रीच्या मदतीने केल्या. टी-20 करियरमधलं हे त्याचं तिसरं शतक आहे, तसंच हा त्याचा टी-20 सर्वाधिक स्कोअरही आहे. या सामन्यातल्या 9 सिक्ससह त्याच्या टी-20 क्रिकेटमध्ये 99 सिक्स झाल्या आहेत. सिक्सचं शतक करण्यापासून आता तो फक्त एक सिक्स लांब आहे.

27 वर्षांच्या बेन मॅकडरमेटने टी-20 क्रिकेटमध्ये त्याचे 2 हजार रन पूर्णही केले. ही त्याची 83 वी मॅच होती. 78 इनिंगमध्ये 33 च्या सरासरीने 2 हजारांपेक्षा जास्त रन केले, यात 3 शतकं आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे, तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 132 चा आहे.

वडील दिग्गज फास्ट बॉलर

मॅकडरमेट ऑस्ट्रेलियाकडून 2 वनडे आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला आहे. बेनचे वडील क्रेग मॅकडरमेट ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फास्ट बॉलर होते. त्यांनी ऑस्ट्रेलियाकडून खेळताना 71 टेस्टमध्ये 291 आणि 138 वनडेमध्ये 203 विकेट मिळवल्या. याशिवाय क्रेग यांनी 174 प्रथम श्रेणीमध्ये 677 विकेटही घेतल्या.

First published: