NCA आणि BCCIच्या निष्काळजीपणाचा कळस, एका चुकीमुळे गोलंदाजाच करिअर धोक्यात!

NCA आणि BCCIचे डोकं ठिकाणावर आहे का? टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाचे करिअर पणाला.

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2019 03:31 PM IST

NCA आणि BCCIच्या निष्काळजीपणाचा कळस, एका चुकीमुळे गोलंदाजाच करिअर धोक्यात!

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्विप दिल्यानंतर आता भारताचे पुढचे लक्ष्य हे बांगलादेशचा संघ असणार आहे. भारत-बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरपासून टी-20 आणि कसोटी मालिका होणार आहे.

दरम्यान, वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ सतत क्रिकेट खेळत आहे. याचा परिणाम खेळाडूंच्या आरोग्यावर आणि फिटनेसवर होत आहे. परिणामी भारताचे आघाडीचे दोन खेळाडू जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या दुखापतीमुळं संघाबाहेर आहेत. भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात बुमराहनं दुखापतीमुळं माघार घेतली. त्यानंतर निवड समितीनं बुमराहच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात जागा दिली नाही तर, उमेश यादवला संघात स्थान दिले. ऐवढेच नाही तर बांगलादेश विरोधातही भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. यासगळ्यात सध्या भुवी आहे कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे.

वाचा-न्यूझीलंडसाठी 'हाय अलर्ट', भारताचा हुकुमी एक्का करणार कमबॅक

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भुवनेश्वर कुमारला संघात जागा न दिल्यामुळं क्रिकेट विश्लेषक हैराण झाले आहे. यातच भुवी आहे कुठे, हे सुध्दा बीसीसीआयच्या वतीनं सांगण्यात आले नाही. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या बातमीमध्ये भुवी सध्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहे, तिकडे आपल्या फिटनेसवर भुवी मेहनत घेत आहे. मात्र अद्याप भुवी पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळं दोन-तीन महिने क्रिकेटपासून दूर असलेल्या भुवीवर एनसीए काय उपचार करतेय, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

वाचा-VIRAL VIDEO : रुमाली रोटी खाणाऱ्यांनो कधी 'चादर रोटी' पाहिली आहे का?

Loading...

दरम्यान, याआधी ऋध्दिमान साहा जवळ जवळ दीड वर्ष संघाबाहेर असताना, त्याच्यावर नीट उपचार करण्यात आले नव्हते, असा आरोप एनसीएवर करण्यात आला होता.टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जुलै 2018 पासून भुवी दुखापतग्रस्त आहे. त्यानंतर वर्ल्ड कपमध्येही तो सामिल झाला. सध्या एनसीएमध्ये असलेल्या भुवीला योग्य ते उपचार मिळत नसल्यानं त्याला क्रिकेटपासून लांब रहावे लागत आहे, असा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे.

वाचा-दिवाळीचा धूर टीम इंडियासाठी धोक्याचा, पहिला सामना रद्द होण्याच्या मार्गावर

भुवीला इतर खेळाडूंप्रमाणे उपचार का नाही?

सुत्रांनी टाइम्सला दिलेल्या माहितीत, “भुवीला पुनरागमन करण्यासाठी एवढा कालावधी का लागत आहे, याबाबत स्पष्टता कोणी दिली नाही आहे. बीसीसीआयच्या वतीनं याआधी हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबाबत माहिती दिली होती. त्यानुसार बुमराह आणि पांड्या यांना इंग्लंडला पाठवण्यात आले होते. मात्र भुवीला योग्य ते उपचार न मिळाल्यानं भुवी दोन महिने क्रिकेटपासून दूर आहे, असा उलगडा करण्यात आला आहे.

दुखापतीमध्येच खेळला वर्ल्ड कप

भुवीला वर्ल्ड कप संघात सामिल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच भुवी दुखापतग्रस्त होता. जुलै 2018 पासून भुवीला हेमस्ट्रिंग आणि मांसपेशींमध्ये त्रास आहे. पाकिस्तान विरोधात वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सामन्यातही भुवीला त्रास झाला होता. मात्र त्यानंतरही भुवी खेळत राहिला. त्याचबरोबर भुवीला आता आवश्यकतेनुसार चांगले उपचारही दिले जात नाही आहेत.

वाचा-शाकिबच्या मॅच फिक्सिंग प्रकरणी नवा खुलासा, समोर आलं IPL कनेक्शन

SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 03:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...