Home /News /sport /

इंग्लंडमध्ये बुमराह-शमीपेक्षाही रेकॉर्ड चांगलं, तरीही या फास्ट बॉलरला 'टीम इंडिया'त चान्स नाही

इंग्लंडमध्ये बुमराह-शमीपेक्षाही रेकॉर्ड चांगलं, तरीही या फास्ट बॉलरला 'टीम इंडिया'त चान्स नाही

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे.

    मुंबई, 8 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. फास्ट बॉलर म्हणून टीममध्ये मोहम्मद शमी (Mohammad Shami), इशांत शर्मा (Ishant Sharma), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), उमेश यादव (Umesh Yadav), मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना संधी मिळाली आहे, पण भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याला मात्र डावलण्यात आलं आहे. दुखापतीनंतर भुवनेश्वर कुमारने इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली होती. भुवनेश्वर कुमारचं इंग्लंडमधलं रेकॉर्डही उत्कृष्ट आहे, त्यामुळे अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं. भुवनेश्वर कुमार स्विंग बॉलर म्हणून ओळखला जातो, इंग्लंडमधलं वातावरण आणि खेळपट्टीही स्विंग बॉलिंगसाठी अनुकूल आहे, असं असलं तरी भुवनेश्वरला का संधी देण्यात आली नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. भुवनेश्वर कुमारने इंग्लंडमध्ये 5 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या आहेत. यात दोनवेळा 5 विकेटचा समावेश आहे. इंग्लंडमधली भुवीची बॉलिंग सरासरी 27 ची आणि स्ट्राईक रेट 55 आहे. तर दुसरीकडे इशांतने इंग्लंडमध्ये 12 टेस्ट खेळून 43 विकेट घेतल्या, त्याची सरासरी 34 आणि स्ट्राईक रेट 61 चा आहे. मोहम्मद शमीने इंग्लंडमध्ये 8 मॅच खेळल्या असून 47 ची सरासरी आणि 77 च्या स्ट्राईक रेटने 21 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने इंग्लंडमध्ये 3 मॅच, 27 ची सरासरी आणि 57 च्या स्ट्राईक रेटने 14 विकेट मिळवल्या. या चारही फास्ट बॉलरची सरासरी बघितली तर भुवनेश्वर कुमारची सरासरी आणि स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. 8 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला साऊथम्पटनमध्ये सुरुवात होईल. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होईल. नॉटिंगहममध्ये ही टेस्ट खेळवली जाईल, तर दुसरी टेस्ट 12 ऑगस्टपासून लॉर्ड्सवर, तिसरी टेस्ट 25 ऑगस्टपासून लीड्सवर, चौथी टेस्ट ओव्हलमध्ये 2 सप्टेंबरपासून आणि पाचवी टेस्ट 10 सप्टेंबरपासून मॅनचेस्टरमध्ये होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारतीय टीम विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव केएल राहुल आणि ऋद्धीमान साहा फिट झाले तर तेदेखील भारतीय टीमसोबत इंग्लंडला जातील. स्टॅण्डबाय खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Jasprit bumrah, Team india

    पुढील बातम्या